इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गोव्यात श्री लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी होऊन ७ जणांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक भाविक जखमी झाले आहे. या सर्व जखमींना गोव्यातील वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात हे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी यात्रा असते. त्यामध्ये ४० ते ५० हजार भाविक सहभागी होत असतात. शनिवारी या ठिकाणी मोठया संख्येन भाविक पोहचले. पण, उतारावर मोठी गर्दी झाल्यामुळे गोंधळ निर्माण झााला. त्यात चेंगराचेंगरी होऊन ७ जणांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे घटनास्थळी गेले. त्यांनी या सर्व घटनेचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.