नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दरवर्षी विविध खेळांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले जाते. या वर्षी येथे तीन-चार खेळांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये टेबल टेनिस खेळाचाही समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या टेबल टेनिस खेळाडूंसाठी यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दिनांक ११ ते २९ मे, २०२२ दरम्यान टेबल टेनिस खेळाच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आणि सायंकाळी या दोन्ही सत्रात हे शिबीर असणार आहे. या शिबीरला टेबल टेनिस प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी नाशिकमधील जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील आणि प्रशिक्षक शशांक वझे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८९०४५८४८८, ९४२३६९८२४९ या क्रमांकवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.