यशदा क्षीरसागर, ज्योतिष पंडित
प्रत्येक राशीची अग्नी, जल, पृथ्वी, वायू अशा तत्वांमध्ये वर्गवारी केलेली आहे. प्रत्येक ग्रहाचेही त्याला मानवेल असे तत्व ठरलेले आहे. उदा. चंद्र हा सौम्य, सर्वात मिसळणारे, सर्वांना सामावून घेणारे असे जल तत्व represent करतो. कर्क ही जल तत्वाची मृदू रास ही त्याला मानवणारी अशी त्याची स्वतःची रास आहे.
एखादा ग्रह कुंडलीत कुठल्या राशीत आहे त्यावरून ही त्या माणसाचे characteristic लक्षात येतात. उदा. भले एखाद्या मनुष्याची मेष राशी आहे. मेष ही मंगळाची रास आहे त्यामुळे तो मनुष्य धडाडी असलेला, कर्तृत्ववान वगेरे असेल असे म्हणायला गेलो तर नेमका कुंडलीत मंगळ हा जल राशीत असेल (कर्क किंवा मीन) (वृश्चिक ही त्याची स्वतःची रास असल्याने तिथे तो चांगली फळे देईल) तर वरील गुण सुप्त रुपात असतील पण आयत्या वेळी हा मनुष्य कच खात असेल, कॉन्फिडन्स ची कमी असेल. खूप चांगली कुंडली असेल परंतु रवी मंगळासारखे ग्रह जर जल राशीत असतील तर एखादा फटाका जर पाण्यात टाकला तर त्याची काय पॉवर असेल असे ते ग्रह तिथे क्षीण होतात. अशा लोकांना सर्व गुण असून public speaking, interviews crack करताना घाम फुटणे, group discussions मध्ये एकदम कमी पडणे असे अनुभव येतात. अनेकदा स्वतःच्या घरात ही स्वतःचे मत मोकळेपणाने मांडता येत नाही.
अशा लोकांनीच पोवळे, माणिक धारण केले तर चांगला उपयोग होतो. गणेश उपासना, सूर्य उपासना फलदायी ठरते. उगाच उठसूट कोणीही पोवळे अथवा माणिक धारण करू नये. हे दोन्ही ग्रह तसे powerful असतात. त्यांचे गुणधर्म योग्य मात्रेत मिळाले तर त्यांचा हवा तसा फायदा करून घेता येतो. नाहीतर भांडकुदळ वृत्ती, हेकेखोर पणाला हवा मिळते अथवा अहंकार वाढीस लागतो. म्हणूनच योग्य विचार करूनच रत्ने परिधान करण्याचा सल्ला द्यावा.