नवी दिल्ली – Xiaomi हा भारतातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड असून जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांमध्येही तिचा समावेश आहे. मात्र चीनमध्ये Xiaomi ला ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. खरं तर, Xiaomi खोटा दावा करून फोन विकल्याबद्दल दोषी आढळले आहे.
या प्रकरणी Xiaomi ला अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना च्या मार्केट पर्यवेक्षण विभागाने या कंपनीला जाहिरात कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी धरले आहे. या प्रकरणी ग्राहकांचा असा आरोप आहे की Xiaomi ने आपल्या मोबाईल फोन Redmi K30 5G साठी Tmall नावाच्या शॉपिंग साइटवर जाहिरात चालवली होती.
या जाहिरातीमध्ये दावा करण्यात आला आहे की, Redmi K30 5G स्मार्टफोनमध्ये Samsung कंपनीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात Redmi K30 5G स्मार्टफोन Amoled ऐवजी LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला होता. Xiaomi ने या प्रकरणी आपली चूक मान्य केली आहे. याला मानवी चूक असेही म्हटले आहे. वास्तविक Xioami Redmi K30 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ डिस्प्ले असून स्क्रीन रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. तसेच फोन पंच-होल डिझाइनमध्ये येतो. फोनमध्ये एलसीडी पॅनल आहे. या शिवाय हा Android 11 आधारित स्मार्टफोन आहे. हा फोन Octacore Qualcomm Snapdragon 765G चिपसेटवर काम करतो.
Redmi K30 5G स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सपोर्टसह देण्यात येतो. फोनच्या मागील पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8 मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर उपलब्ध आहेत. या फोनमध्ये 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे ड्युअल फ्रंट कॅमेरे आहेत. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.