इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय वंशाचे अनेक जण परदेशात राजकीय क्षेत्रात मोठ-मोठ्या पदावर आहेत. विशेषतः अमेरिकेत आणि युरोपात त्यातही इंग्लंडमध्ये अनेक उच्च पदावर भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत, त्यापैकीच एक म्हणजे ऋषी सुनक होय. गेल्यावर्षी ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना ब्रिटनमधील सर्वांत तरुण पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. मात्र सुधा मूर्ती यांनी यासंदर्भात केलेले एक वक्तव्य सध्या तुफान व्हायरल होत आहे.
ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लडमध्ये झाला, त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच एक भारतीय आणि दक्षिण आशियाई वंशाचा खासदार युकेच्या पंतप्रधानपद झाला आहे. सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती. पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातले आहेत. यशवीर डॉक्टर होते आणि उषा फार्मसी चालवायच्या. पण ऋषी सुनक फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्राकडे वळले. मात्र गेल्या दीडशे वर्षांपासून त्यांचे वंशज इंग्लंडमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते.
सुधा मूर्ती म्हणाल्या की, मी माझ्या नवऱ्याला उद्योगपती केले. माझ्या मुलीने तिच्या नवऱ्याला पंतप्रधान केले, असे त्या म्हणाल्या. पत्नीची खूप ताकद असते. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती व इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे. या दोघांचा विवाह सन २००९ मध्ये झाला. मात्र लग्नानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला असल्याचेही सुधा मूर्ती यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
कुटुंबात दर गुरुवारी उपवास धरण्याची प्रथा आहे. खुद्द सुधा मूर्ती यांनीच या व्हिडीओमध्ये या उपवासासंबंधित माहिती दिली आहे. दर गुरुवारी उपवास करण्याची आमच्या घरात फार पूर्वीपासून परंपरा आहे. आम्ही गुरुवारीच इन्फोसिस सुरू केली होती. त्याचप्रमाणे ऋषी सुनकही धार्मिक आहेत, असेही सुधा मूर्ती यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले.
Writer Sudha Murty Video Viral on Womens Success