नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीची निवडणूक केंद्र सरकारनं लांबणीवर टाकली आहे. समितीसाठी पुढील महिन्याच्या सात तारखेला मतदान होणार होतं. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेत सरकारनं हा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे.
कार्यकारी समितीच्या या निवडणुका तटस्थ संस्था किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच घेतल्या जाव्यात असं पत्र युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं भारतीय ऑलिंपिक असोसिएशनला पाठवले आहे. महासंघातले गैरव्यवहार तसंच लैंगिक शोषणाविरुद्ध नामवंत खेळाडूंनी केलेल्या आरोपासंबधी चौकशी समितीचा अहवाल आला आहे. या अहवालाचे परिक्षण सुरु आहे असंही या पत्रात म्हटलं आहे. अहवालाच्या प्राथमिक निरिक्षणावरून तक्रारींची दखल घेण्यासाठी कुस्ती महासंघाची कोणतीही अंतर्गत व्यवस्था नसल्याचं दिसून येतं असंही या पत्रात म्हटलं आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650520461166665728?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650520494406524928?s=20
Wrestling Federation of India Election