नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लैगिंक छळ प्रकरणी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी गेल्या काही दिवसापासून दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली पोलिसांनी या संदर्भात आता तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनी या संदर्भातील तपासासाठी कजाकिस्तान, मंगोलिया, इंडोनेशिया या देशांकडून मदत मागितली आहे. सिंह यांच्यावर अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणी देशभरात अद्याप चांगलेच वादंग सुरू आहे.
कुस्ती महासंघ निवडणूक
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता दिल्ली पोलिसांनी तिन्ही देशांतील कुस्ती महासंघांना नोटीस पाठवली आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो देण्यास सांगितले आहे. महिला कुस्तीपटूंनी सन २०१६, २०१८ आणि २०२२ मध्ये येथे लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी नुकतेच जंतरमंतरवर सुरू असलेले त्यांचे धरणे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र मागणी आंदोलन मात्र सुरूच आहे. सध्या कुस्ती महासंघात निवडणुकीची तयारी सुरू आहे.
निवडणुकीत अपात्र
दि. ४ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली. यासाठी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल यांना निवडणूक निर्णय अधिकारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिंह यांना ही निवडणूक लढवता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचा तीन वेळा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून नियमानुसार ते कोणत्याही पदासाठी निवडणूक लढवू शकत नाही.
सध्या दोन गुन्हे दाखल
कोणत्याही परिस्थिती लैगिंक छळ प्रकरणी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती, त्याकरिता काही कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही पैलवान विरोध मागे घेतला. आता दि. १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा पैलवानांना असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आंदोलनाबाबत मोठी घोषणा होऊ शकते.
विशेष म्हणजे कुस्तीपटू विनेश फोगटने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीही चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. सुरुवातीला पैलवान सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. सध्या दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे नोंदवले आहेत. आता पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.