विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कुस्तीपटू सागर हत्याप्रकरणामुळे प्रसिद्ध कुस्तीपटू सुशीलकुमार सध्या खूपच अडचणीत आला आहे. कारण सुशीलकुमार विरोधात गुन्हा दाखल होऊन साडेचार वर्षे झाली, परंतु अद्याप आरोपपत्र झालेले नाही? अशी विचारणा करत सागर हत्याप्रकरणाची चौकशी करणार्या गुन्हे शाखेने याची सविस्तर माहिती मध्य दिल्ली जिल्हा पोलिसांकडून मागितली आहे.
विशेष म्हणजे दिल्ली पोलिस अद्याप सुशीलविरूद्ध ठोस आणि सबळ साक्षीदार तयार करू शकले नाहीत. यात केवळ चार किरकोळ साक्षीदार असून ते न्यायालयात माघार घेण्याची अपेक्षा आहे. याशिवाय सुशीलकुमारला आपल्या कृतीबद्दल काहीच पश्चाताप नाही, असेही सांगण्यात येते.
दुसरीकडे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सुशीलविरोधात सन 2017 मध्ये पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण सुशीलने आयपी इस्टेट पोलिस स्टेशन परिसरातील स्टेडियममध्ये दुसर्या कुस्तीपटूवर हल्ला केला होता. मात्र असे असूनही मध्य दिल्ली जिल्हा पोलिसांनी अद्याप या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच हा खटला अद्याप साडेचार वर्षानंतर प्रलंबित आहे.
आता सुशीलविरोधात आयपी इस्टेट पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या खटल्याची संपूर्ण माहिती गुन्हे शाखेने मागविली आहे. त्यामुळे सागर हत्येचा खटला आणखी बळकट होऊ शकेल. याकरिता सर्व दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने फोन करून पुन्हा त्यांची निवेदने घेतली आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार सुशीलला गुन्हे शाखेच्या कार्यालयात तयार केलेले भोजन दिले जात आहे. मात्र त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.