नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल केलेल्या दोन एफआयआरचा तपशील समोर आला आहे. एरवी अन्य एफआयआरची माहिती तत्काळ बाहेर येत असताना या प्रकरणात मात्र तब्बल महिन्याभराने अनेक बाबी उघड झाल्या आहेत.
ब्रिजभूषण यांच्यावर दिल्ली पोलिसांनी एकूण २ एफआयआर दाखल केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही एफआयआरमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. हे दोन्ही एफआयआर २८ एप्रिल रोजी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये कुस्तीपटूंना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, छातीवर हात घासणे, असे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या एफआयआरमध्ये खासदार ब्रिजभूषण यांनी सहा प्रौढ कुस्तीपटूंना अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. बहाणा करून छातीवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. श्वास तपासण्याच्या बहाण्याने त्यांचा टी-शर्टही काढला. जखमी महिला खेळाडूंचा खर्चावरुनही लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची मागणीही त्यांनी केली. खेळाडूने नकार दिल्यानंतर चाचणीत त्यांच्याशी भेदभाव करण्यात आला, असा आरोप आहे.
दुसरीकडे, दुसऱ्या एफआयआरमध्ये, एका अल्पवयीन कुस्तीपटूने आरोप केला आहे की, तिला खोलीत बोलावून तिच्यावर अश्लील कृत्य केले. परंतु ती पळून जाण्यात यशस्वी झाली. कलम 354, 354A, 354D आणि कलम 34 अंतर्गत बृजभूषण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुस्तीपटूंच्या आरोपांबाबत खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, दिल्ली पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. एकही आरोप सिद्ध झाला तर मला फाशी होईल. पूर्वी पैलवानांची काही मागणी होती, आता काही औरच झाली आहे. कोण काय म्हणतंय याने काही फरक पडत नाही. त्यांचे शब्द आणि भाषा सतत बदलत असतात.
दरम्यान, हरियाणाच्या कुस्तीपटूंच्या सन्मानाची लढत आता पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचली आहे. ज्यासाठी शेतकरी नेत्यांशिवाय अनेक संघटना पुढे आल्या आहेत.
Wrestler Protest Delhi Police FIR Brij bhushan