विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गेल्या दीड वर्षापासून देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. आता काळी बुरशी, पांढरी बुरशी तर कधी पिवळी बुरशी लोकांचे आयुष्य संपवत आहे. गुजरामध्ये आता एक नवा बुरशीचा आजार समोर आला आहे. त्याचे नाव आहे एस्परगिलोसिस.
बडोद्याच्या एसएसजी रुग्णालयात नव्या बुरशीच्या आजाराचे आठ रुग्ण आढळले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या लोकांना होणा-या काळ्या आणि पांढ-या बुरशीप्रमाणेच कोरोनातून बरे झालेल्यांना किंवा बाधित लोकांना हा आजार होत आहे.
डॉ. शीतर सांगतात, कोरोना रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर केला जात आहे. ऑक्सिजनची पातळी स्थिर ठेवण्यासाठी नॉन स्टेरलाइट पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे बुरशीजन्य आजाराची इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. स्टेरॉइचा अतिवापर आणि शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्यामुळे काळ्या बुरशीची लागण होत आहे.
एस्परगिलोसिस म्हणजे काय