मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ही आहे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ; पंतप्रधानांच्या हस्ते १३ जानेवारीला होणार शुभारंभ

by Gautam Sancheti
जानेवारी 8, 2023 | 4:37 pm
in संमिश्र वार्ता
0
image0011PM7

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाराणसी येथे १३ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमव्ही गंगा विलास या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ भारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु करेल, असे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले. ही लक्झरी क्रूझ भारतातील ५ राज्ये आणि बांगलादेश मधील २७ नद्यांमधून ३२०० किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करेल, असे त्यांनी सांगितले. या सेवेच्या प्रारंभानंतर रिव्हर क्रूझची आजवर वापरात न आलेली प्रचंड क्षमता खुली होणार आहे, असेही सोनोवाल म्हणाले.

देशातील सर्वोत्कृष्ट सेवा जगासमोर आणण्यासाठी एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या ५१ दिवसांच्या प्रवास नियोजनात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदीचे घाट यासोबतच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. एमव्ही गंगा विलास क्रूझ ६२ मीटर लांब, १२ मीटर रुंद आणि १.४ मीटरच्या ड्राफ्टसह आरामदायी प्रवास करते. यात तीन डेक आणि ३६ पर्यटक क्षमतेचे १८ सुइट्स आहेत. या सुइट्समध्ये पर्यटकांना एक संस्मरणीय आणि विलासी अनुभव देणाऱ्या सर्व सुविधा आहेत. एमव्ही गंगा विलासच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील ३२ पर्यटक वाराणसी ते दिब्रुगड प्रवासाचा आनंद लुटतील. दिब्रुगडमध्ये एमव्ही गंगा विलासच्या आगमनाची अपेक्षित तारीख १ मार्च २०२३ आहे.

भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी थांबणार असून त्यासोबतच भारताच्या समृद्ध वारश्याचे दर्शन होईल अशा पद्धतीने एमव्ही गंगा विलासच्या प्रवासाची रूपरेषा आखण्यात आली आहे. ही क्रुझ वाराणसीतील प्रसिद्ध “गंगा आरती” पासून ते बौद्ध धर्मासाठी अत्यंत आदराचे ठिकाण असलेल्या सारनाथचे दर्शन घडवेल. क्रुझ आपल्या प्रवासात तांत्रिक विधीसाठी प्रसिद्ध असलेल्या मायॉन्ग आणि मजुली या सर्वात मोठ्या नदी बेटाला भेट देईल. सोबतच आसाममधील वैष्णव पंथीयांचे सांस्कृतिक केंद्रालाही भेट दिली जाईल. बिहार स्कूल ऑफ योगा आणि विक्रमशिला विद्यापीठाला देखील प्रवासी भेट देतील. या भेटीमुळे प्रवाशांना भारताचा अध्यात्म आणि ज्ञानाचा समृद्ध वारसा जवळून पाहता येईल. समुद्रपर्यटन आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालच्या उपसागरातील सुंदरबनच्या जैवविविधतेने नटलेल्या समृद्ध जागतिक वारसा स्थळांवरून तसेच एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातूनही ही क्रुझ प्रवास करेल. देशात रिव्हर क्रूझ पर्यटन विकसित करण्याची गरज सोनोवाल यांनी अधोरेखित केली. या क्षेत्राच्या पर्यटन विकासामुळे दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या चार जिल्ह्यात तांदळाचा पुरवठाच नाही; विद्यार्थ्यांचे मध्यान्ह भोजन अडचणीत

Next Post

सिद्धार्थ जाधवला अभिनेता नाही तर हे व्हायचे होते…. त्यानेच केला खुलासा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
sidhart jadhav

सिद्धार्थ जाधवला अभिनेता नाही तर हे व्हायचे होते.... त्यानेच केला खुलासा

ताज्या बातम्या

पर्यटन सुरक्षा दल नेमण्याची कार्यवाही करणेबाबत बेठक 1 1024x615 1

आता गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पाँईट येथे पर्यटन सुरक्षा दल…

ऑगस्ट 5, 2025
election6 1140x571 1

बिहारमध्ये राजकीय पक्षांकडून मतदार यादीबाबत चार दिवसात दावे-हरकतींचे १,६०,८१३ अर्ज….

ऑगस्ट 5, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिस अधिकाऱ्यांना दिली जन्मठेपेची शिक्षा…इतका दंडही ठोठावला

ऑगस्ट 5, 2025
image001S14B

या बँकेने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे लाभांशचा २२.९० कोटीचा धनादेश केला सुपूर्द

ऑगस्ट 5, 2025
INDIA GOVERMENT

पहलगाम हल्लेखोरांची ओळख आणि पार्श्वभूमी याबद्दलचा अहवाल…केंद्राने दिले हे स्पष्टीकरण

ऑगस्ट 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाचा योग, जाणून घ्या, मंगळवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 4, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011