बीजिंग – जगात सर्वाधिक उंच व्यक्ती असो, की बुटकी व्यक्ती असो, याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटते. त्यातही काही जणांचे हात लांब तर कुणाचे पाय लांब असतात. परंतु चीनमधील एका महिलेच्या डोळ्यांच्या पापण्याची लांबी सर्वाधिक असून तिच्या या रेकॉर्डबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत असून चार यापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली होती. आगळीवेगळी ईश्वरी देणगी लाभलेल्या महिलेने आहे की, भगवान बुद्धाने आशीर्वादाने मला ही दैवी देणगी लाभली आहे.
काही लोक विचित्र रेकॉर्ड बनवतात आणि प्रसिद्ध होतात. जर एखाद्या महिलेने सर्वात मोठ्या पापण्यांनी डोळे मिटवण्याचे रेकॉर्ड केले तर आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु एका चिनी महिलेने हे सिध्द केले आहे. यू झियानझिया असे या महिलेचे नाव असून तिच्या डोळ्याच्या पापण्यांची लांबी साधारण आठ इंच आहे. यू झियानजियाने २०१६ मध्ये या लांबीसाठी यापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. त्यावेळी, त्याच्या पापण्यांची लांबी १२.५ सेमी होती. पण आता म्हणजे पाच वर्षांनंतर ही लांबी २०.५ सेमी झाली असून अशा प्रकारे तिने स्वत: चा विक्रम मोडला आहे.
या चिनी महिलेच्या डोळ्याला पाहून सामान्य माणसाप्रमाणेच डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. या महिलेच्या पापण्या सामान्य पासून तिच्या गालांच्या तळाशी वाढल्या आहेत. परंतु यु झियानझिया यांना असा विश्वास वाटतो की, ही भगवान बुद्धांनी त्यांना दिलेली भेट आहे. यासंदर्भात ती डॉक्टरांकडेही गेली पण डॉक्टरही तिला या पापण्यांबद्दल काही सांगू शकले नाहीत. तिला रोजची कामे करतानाही त्यांना कोणतीही अडचण येत नाही. तसेच मेकअप करत असतानाही काहीच अडचण येत नाही.