श्रावण सोमवार विशेष
– जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग १७
३६५ शिवलिंगे असलेले एकमेव शिवमंदिर
तिरुवरुरचे त्यागराज मंदिर!
(क्षेत्रफळ ८०,९३७ चौरस फुट)
आज आपण तामिळनाडुतील तिरुवरुर येथील प्रख्यात त्यागराज मंदिराचा परिचय करून घेणार आहोत. शैव परंपरेतील सर्वांत पवित्र मंदिरात तिरुवरुर येथील त्यागराज मंदिराचा प्रामुख्याने समावेश केला जातो. १३०० वर्षांपूर्वी देखील हे मंदिर अस्तित्वात होते यावरून त्याचे प्राचीनत्व सहज लक्षात येते. देवी पार्वतीला शापमुक्त करण्यासाठी भगवान विष्णू यांनी हे मंदिर स्थापन केले असे सांगितले जाते.

मो. ९४२२७६५२२७
तंजावूर पासून ५५ किमी अंतरावर असलेल्या तिरुवरुर येथे त्यागराज स्वामींचे रथ शैलीतील तामिळनाडुमधील सर्वांत मोठे मंदिर आहे. तिरुवरुर म्हणजे तामिळनाडूमधील सुप्रसिद्ध संत त्यागराज यांची जन्मभूमी. येथेच या महान भक्ताचा जन्म झाला होता. या मंदिरात भगवान शिवाची स्वयंभू मूर्ती आहे. हजार वर्षांपासून भगवान त्यागराज म्हणजे राजा महाराजांचा देव अशी अशी या मंदिराची ख्याती आहे. नऊ एकर जागेवर वसलेले हे मंदिर राजेंद्र चोल प्रथम ( इ.स. १०१२-१०४४) यांच्या शासनकाळत बांधले गेले आहे. राजराज चोल त्यागराज स्वामींचे परम भक्त होते.
मंदिरात प्रवेश करतांच अतिशय भव्य असे मुख्य मंदिर लक्ष्य वेधून घेते.या मंदिराला ९ राजगोपुरम म्हणजे भव्य प्रवेशद्वार , ८० विमानं म्हणजे मंदिरांवरील नक्षीदार गोलाकार घुमट, 12 उंचच उंच संरक्षक भिंती, 13 मंडपम म्हणजे दगडी सभामंडप, १५ दगडी कुंड किंवा विहीरी, विविध प्रकारची फुले आणि हिरवळने बहरलेली ३ विशाल उद्याने, ३ भव्य प्राकारम्हणजे प्रदक्षिणा मार्ग आणि वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतिनिधीत्व करणारी ३६५ शिवलिंगे येथे पहायला मिळतात . त्याच प्रमाणे १०० पेक्षा अधिक शिरीन आणि विनायकांच्या ८६ मूर्ती असलेल्या या मंदिरांत २४ पेक्षा अधिक मोठ मोठी कलाकुसर युक्त दगडी मंदिरं आहेत. मुख्य त्यागराज मंदिर अतिशय विशाल असून संपूर्ण पणे पाषाणतुन घडविलेले आहेत.
वाल्मिकनाथ स्वामी ही इथली प्रमुख देवता असली तरी या मंदिराचे नाव भगवान त्यागराज मंदिर असे आहे. भगवान त्यागराज म्हणजे भगवान शिव, श्री उमा आणि भगवान विष्णु द्वारे बनविलेले सोमास्कन्द रूपातील भगवान सुब्रह्मण्यमचे रूप आहे. या मंदिरात त्यागराज, कमलंबा आणि वनमिक नंथर यांचा निवास आहे. मंदिराचा प्रत्येक स्तंभ आणि मंडपम अत्यंत कलाकुसरीने दगडातून घडविलेले आहेत.
https://twitter.com/AnuSatheesh5/status/1505522746435854340?s=20
मंदिर निर्मितीची आख्यायिका
या मंदिराची निर्मिती कशी झाली याविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. चोल राजवंशांत मुचुकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होउन गेला. त्याने देव आणि असुर यांच्या युद्धात इंदिरा व इतर सर्व देवतांचे असुरापासून रक्षण केले होते .त्यामुले इंदिराने मुचकुंद ला काहीतरी अमूल्य भेट देण्याचे ठरविले. मुचकुंदला इंदिराची अतिशय प्रिय असलेली भगवान त्यागराजाची प्रतिमा आवडली होती. तिच त्याला हवी होती. इंदिराने आपल्या कलाकारांना मूळ प्रतिमे सोबत त्यागराजाच्या आणखी ६ प्रतिमा बनवायला सांगितल्या.या सर्व ७ प्रतिमा मुचकुंद समोर ठेउन मूळ प्रतिमा निवडायला सांगितली. मुचकुंदने आपल्या दैवी शक्तीद्वारे मूळ प्रतिमा निवडली.त्यामुळे प्रसन्न झालेल्या इंदिराने त्याला सर्व सातही प्रतिमा भेट दिल्या.
मुचकुंदने आपली राजधानी असलेल्या तिरुवरुर येथे भगवान त्यागराजची मुळ प्रतिमा स्थापन केली आणि उर्वरित सहा प्रतिमा विविध ठिकाणी स्थापन केल्या. या सात स्थानांना ‘सप्तविद्या स्तंभ’ असे म्हणतात. या सर्व स्थानांना व येथील शिवलिंगांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतात.
1) तिरुवरुर येथे विधी विदंगार या नावाने , 2) तिरुनेलुरु येथे नागरा विदंगार नावाने, 3) नागपट्टिनम येथे सुंदरा विदंगर नावाने, 4) तिरुवावलाई येथे अवनी विदंगार नावाने, 5) तिरुवाइमुर येथे नीला विदंगर नावाने, 6) वेदारण्यम येथे भुवनी विदंगर या नावाने आणि 7) तिरुक्करावल येथे आदि विदंगर या नावांनी ही सात शिवलिंगे ओळखली जातात. ही सर्व शिवलिंगं आकाराने हातात धरता येतील एवढी छोटी आहेत .
भगवान त्यागराज मंदिरात त्यागराज लिंगा ऐवजी ‘मराठा लिंगा’ वर दररोज तीन वेळा अभिषेक केला जातो. सकाळी साडे आठ, सायंकाली सात वाजता आणि रात्री अकरा वाजता अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यावर शिवलिंग फुलांनी सजवून चांदीच्या पेटीत ठेवतात. नंतर ही पेटी त्यागराज शिवलिंगाच्या उजव्या बाजूला ठेवतात.
सर्वांत मोठा रथोत्सव
त्यागराज स्वामी मंदिराचा रथ महोत्सव केवळ या मंदिराचाच नाही तर तामिळनाडुमधील सर्वांत मोठा रथोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. साधारणपणे एप्रिल महिन्यात हा रथोत्सव साजरा केला जातो. त्यागराज स्वामी मंदिराचा रथ ९० फुट उंच आणि ३०० टन वजनाचा असून अशिया खंडातील हा सर्वांत मोठा रथ आहे असे म्हणतात.उत्सवाच्या वेळी मंदिरा भोवतीच्या चारी मुख्य मार्गावरून हा रथ मिरविला जातो या राथोत्सवात तामिळनाडु मधील लाखो भाविक सहभागी होतात.
https://twitter.com/airnewsalerts/status/743440263075364865?s=20
दर्शन वेळ: सकाळी ०५.०० ते 12.००, सायंकाली ०४.०० ते ०९.००
संपर्क : श्री त्यागराज मंदिर, तिरुवरूर -610 001. तिरुवरूर जिला.
फ़ोन: +91- 4366 – 242 343, +91- 94433 54302.
लेखन – विजय गोळेसर मोबा.९४२२७६५२२७
Worlds Largest Temple Thiruvarur Thyagaraja Temple by Vijay Golesar