गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हे आहे जगातील सर्वात मोठे मंदिर… १४ एकर परिसर… देशातील बेस्ट क्लीन आयकॉनिक प्लेस… मदुराईचे मीनाक्षी मंदिर…

by India Darpan
एप्रिल 23, 2023 | 9:43 pm
in इतर
0
FlZ5P2JagAARYPr

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग २१ 
चौदा एकर जागेवरील
‘देशातील बेस्ट क्लीन आयकॉनिक प्लेस’
मदुराईचे मीनाक्षी मंदिर!

जगातील सर्वांत मोठे मंदिर या ‘इंडिया दर्पण’च्या विशेष लेख मालेत आज आपण मदुराईच्या सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची माहिती करुन घेणार आहोत. क्षेत्रफळानुसार जरी या मंदिराचा जगात २१ वा नंबर येत असला तरी चौदा एकर जागेवर वसलेल्या भारतातील ह्या मंदिराला ‘बेस्ट क्लीन आयकॉनिक प्लेस’ असे नाव दिले जाते. हे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये मानले जाते.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

तामिळनाडूला दक्षिण भारताचं प्रवेशद्वार मानतात व मदुराई शहर हे पूर्वेचं अथेन्स म्हणून ओळखलं जातं. निसर्गाच्या कुशीतलं, वैगेई नदीच्या सुपीक वेढय़ानं संपन्न, संस्कृती व कलाविद्यांना आश्रय देणारं, शांत, उन्नत आध्यात्मिक पायावर वसलेलं, ख्रि.पू. ३०० वर्षांआधीपासून अस्तित्वात असलेल्या मधुरा म्हणजेच मधुरपुरम संस्कृत नावापासून बनवलेल्या शहराचं हे मीनाक्षी मंदिर आभूषणच आहे. इथं सुंदरेश्वरस्वामी असूनही मंदिराचं मीनाक्षीदेवीच्या नावानं ओळखलं जाणं ही गोष्ट भारतीय संस्कृतीतलं स्त्रीदाक्षिण्यच अधोरेखित करतं.
मीनाक्षी अम्मान मंदिर हे मिनाक्षी-सुंदरेश्वरार मंदिर म्हणून ही ओळखले जाते.

हे भारतातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक आहे. मदुराई शहरात वसलेल्या या मंदिराला एक पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव सुंदरेश्वरच्या रूपात आले आणि मंदिर सध्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पार्वती (मीनाक्षी) बरोबर लग्न केले. आपल्या आश्चर्यकारक वास्तूसाठी प्रसिद्ध असलेल्या, मीनाक्षी मंदिराचे नाव जगाच्या चमत्कारांपैकी एक म्हणून मानले गेले आहे . हे दक्षिण भारतातील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे, जिथे दररोज हजारो भाविक दर्शनाचा आनंद घेतात.

मीनाक्षी अम्मान मंदिराचा इतिहास
मीनाक्षी मंदिराचा इतिहास प्राचीन आहे. हे शहर त्याच्या इतिहासाइतकेच जुने आहे, कुलशेखर पांडियन या राजाने पांड्या राजघराण्यावर राज्य केले. त्याने स्वप्नात भगवान शिवने दिलेल्या सूचनांनुसार मंदिर बांधले. हे मंदिर आजही उभे आहे, परंतु मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी तो नष्ट केल्यामुळे हे मंदिर 16 व्या शतकात पुन्हा बांधले गेले. चौदाव्या शतकात, दिल्ली सल्तनतचा सेनापती मलिक काफूर आपल्या सैन्याच्या दक्षिणेकडील बहुतेक भागात ओलांडला आणि प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरासह अनेक मंदिरे लुटली. सोने, चांदी आणि मौल्यवान रत्ने अशा मौल्यवान वस्तू दिल्लीला घेऊन गेला.

त्या काळातील मंदिरांमध्ये मौल्यवान वस्तूंची विपुलता असल्याने बहुतेक मंदिरे मोडकळीस पडली आणि जेव्हा मुस्लिम सल्तनतचा पराभव करून विजयनगर साम्राज्याने मदुरैचा ताबा घेतला तेव्हा मंदिर पुन्हा बनविण्यात आले. 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि नायक घराण्याचे राजा विश्वनाथ नायक यांनी 17 व्या शतकाच्या उत्तरार्धात मंदिराचा विस्तार केला. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मंदिराची पुनर्बांधणी करताना नायक घराण्याच्या राज्यकर्त्यांनी सिल्पा धर्मग्रंथांच्या स्थापत्य शैलीचा अवलंब केला.

इ.स. १६२३ ते १६५५ या काळात मदुराईवर राज्य करणाऱ्या तिरुमलाई नायक यांनी पुन्हा एकदा मंदिराचा विस्तार केला. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मंडप बांधले गेले (पिलाडे हॉल). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी येण्यापूर्वी अनेक नायक राज्यकर्त्यांनी या मंदिराचा विस्तार केला. ब्रिटीशांच्या काळात मंदिर पुन्हा खंडित झाले आणि त्यातील काही भाग नष्ट झाले. १९५९ मध्ये तामिळ हिंदूंनी निधी जमा करून आणि इतिहासकार व अभियंत्यांच्या मदतीने जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. १९९५ मध्ये मंदिर पूर्णपणे पुनर्संचयित झाले.

मीनाक्षी मंदिराची रचना :
हे मंदिर मदुराईचा मध्यभागी असून ते चौदा एकरांवर पसरलेले आहे. हे मंदिर मोठ्या भिंतींनी संरक्षित करण्यात आले आहे. वरून पाहिल्यास संपूर्ण रचना वर्तुळाकार दिसते. मंदिर संकुलामध्ये विविध मंदिरे बांधली आहेत. सुंदरेश्वर आणि मीनाक्षी यांना समर्पित दोन मुख्य मंदिरांव्यतिरिक्त, मंदिरात गणेश आणि मुरुगन सारख्या इतर अनेक देवतांना समर्पित मंदिरे आहेत.
या मंदिरात लक्ष्मी, रुक्मिणी आणि सरस्वती देवी देखील आहेत. या मंदिरात “पत्थरराई कुलम” नावाची एक पवित्र कुंड आहे. “पोतरमाराई कुलम” हा शब्द म्हणजे सोन्याच्या कमळांसह तलावाचे शाब्दिक भाषांतर आहे. तलावाच्या मध्यभागी एक सोनेरी कमळ रचना आहे.

मंदिरात चार मुख्य दरवाजे आहेत (गोपुरम) जे एकमेकांसारखे दिसतात. चार गोपुरामांव्यतिरिक्त, मंदिरात इतर अनेक गोपुरम आहेत, जे अनेक तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार म्हणून काम करतात. मंदिरात एकूण 14 प्रचंड दरवाजे आहेत. त्यापैकी प्रत्येक एक बहु-मजली रचना आहे आणि हजारो पौराणिक कथा आणि इतर अनेक शिल्पे दाखवते. मंदिराचे प्रमुख ‘गोपुरम’ असे आहेत:

मीनाक्षी मंदिराचे प्रमुख ‘गोपुरम’ :
कडाका गोपुरम – हे विशाल प्रवेशद्वार मुख्य मंदिराकडे जाते ज्यामध्ये देवी मीनाक्षी राहतात. 16 व्या शतकाच्या मध्यात टुम्पीची नायककर यांनी प्रवेशद्वार बांधले होते. गोपुरममध्ये पाच मजले आहेत.
सुंदरेश्वर मंदिर गोपुरम – हे मंदिरातील सर्वात प्राचीन ‘गोपुरम’ आहे आणि हे कुलशेखर पांड्याने बांधले आहे. ‘गोपुरम’ सुंदरेश्वर (भगवान शिव) यांचे प्रवेशद्वार म्हणून काम करते.
चित्रा गोपुरम – मारवर्मन सुंदर पांडियान यांनी तयार केलेले, गोपुरम हिंदू धर्मातील धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष सार प्रतिबिंबित करतात.
नाडूक्कट्टू गोपुरम – ‘इडिकट्टू गोपुरम’ म्हणूनही ओळखले जाणारे हे प्रवेशद्वार गणेश मंदिराकडे जाते. प्रवेशद्वार दोन मुख्य मंदिरांच्या दरम्यान ठेवलेले आहे.
मोताई गोपुरम – या ‘गोपुरम’ मध्ये इतर गेटवेपेक्षा कमी प्लास्टर प्रतिमा आहेत. विशेष म्हणजे जवळपास तीन शतके मोताई गोपुरमकडे छप्पर नव्हते.
नायक गोपुरम – हे ‘गोपुरम’ सुमारे 1530 मध्ये विश्वप्पा नायक यांनी बनवले होते. ‘गोपुरम’ आश्चर्यकारकपणे दुसर्‍या प्रवेशद्वारासारखेच आहे, ज्याला ‘पल्हाई गोपुरम’ म्हणतात.

सुवर्णयुग, सुखसमृद्धी, भरभराट, निर्यात, विज्ञानशाखांमध्ये नेत्रदीपक प्रगती, श्रेष्ठ कलाविष्कार व टोकाची धार्मिक आस्था या सर्वाचं प्रतीक असलेला, जवळजवळ सत्तर हजार चौरस मीटरवरील भूभागावर चौदा गोपुरांनी नटलेला हा मंदिर समूह पाहणं ही कलासक्त, शिल्पप्रेमी, अभ्यासक व सामान्य माणसालाही एक अनोखी मेजवानीच होय! इथल्या श्रीमीनाक्षीदेवी व सुंदरेश्वरस्वामी या दोन मुख्य मंदिरांशिवाय एकूण ऐंशीच्या आसपास असलेली उपमंदिरं, मंडप व पुष्करिणी, इ. पूर्णपणे पाहण्यासाठी पूर्ण दिवसही कमीच पडतो. पंडय़ा, चोल व नायक या तीन राजघराण्यांनी सलगपणे ८०० वर्ष याचं बांधकाम केलं, यावरून त्यासाठी आलेल्या खर्चाची व मंदिराच्या अजस्र विस्ताराची कल्पना यावी!

पांडवांशी रक्ताचं नातं असलेल्या पांडय़ा राजघराण्यातील कुलेश्वर राजाच्या काळात, कदंबवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात एक स्वयंभू लिंग सापडलं. काही काळानं त्या संरक्षित स्वयंभू शिवलिंगावर कुलशेखर राजाने एक सुंदर मंदिर उभारलं. प्राचीन काळी पूर्ण लाकडाचं व त्यानंतर दगडीविटा व त्याहीनंतर सातव्या शतकात ते पूर्णपणे दगडाचं बनविलं गेलं असाव असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. निसर्गातील अदृश्य ऊर्जा, पंचमहाभूतांचं संतुलन व वास्तुशिल्पशास्त्रांच्या सूत्रांचं काटेकोर पालन करून बांधलेली ही वास्तू लोकप्रियता व प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

द्रविड स्थापत्यकलेचा जणू आरसाच असलेला हा मंदिरसमूह, ८४७ फूट लांब व ८०० फूट रुंद व ४० फूट उंच अशा दणकट दगडी, भिंतीमध्ये सुरक्षित आहे. अत्यंत जागृत असल्याने विदेशी आक्रमण व मूर्तिभंजकांच्या तावडीतून हे मंदिर अनेक वेळा सुटलं. इथं शिवाच्या ६४ लीलांचं दर्शन होतं. यात चौदा गोपुरं, १५०० पेक्षा जास्त खांब व अनेक मंडप या सर्वाच्या अवाढव्य पसाऱ्यामुळे मार्गदर्शनाशिवाय एकदा प्रवेश केलेली व्यक्ती मंदिराबाहेर येऊच शकत नाही.

पूर्वेकडून प्रवेश केल्यावर प्रथम अष्टशक्ती मंडप लागतो. मंडपाच्या दोन्ही बाजूंना महालक्ष्मी, महेश्वरी, यज्ञरूपानी, इ. आठ खांबांवर शक्तिरूपं चार-चार अशी विभागलेली असून द्वारपालक, गणपती व मुरुगन यांच्याही सुबक मूर्ती आहेत. इथं अनेक रंगीत चित्रं व शिल्पं आहेत व त्यामध्ये मुख्यत: शिवजींच्या लीला दाखविल्या गेल्या आहेत. यात श्रीमीनाक्षीदेवीची जन्मकथाही चित्ररूपात रंगविली आहे. ही चित्रं वा शिल्पं भिंतींवरती आहेत. मुख्यत: तिरुविलायादल पुराणातील प्रसंग असून मंडपाच्या पूर्वेकडील बाजूला शैव संतांच्या आकृत्या आहेत.

यानंतर नायक राजांनी बांधलेला मीनाक्षी नायक मंडप लागतो. इथं पाच मोकळ्या जागा सहा खांबांच्या रांगांनी बनल्या आहेत. हे खांब शिल्पकृतीयुक्त असून विविध आकृत्या कोरीव व आकर्षक आहेत. अष्टशक्ती मंडप व नायक मंडप यांना जोडणारा आणखी एक मंडप असून, शिवपार्वतीच्या प्रतिमा आहेत. त्यात शिकारी रूपात दाखविलेलं शिवाचं रूप अत्यंत मोहक आहे. या मंडपाच्या पश्चिमेकडे एक हजार आठ पितळी व मोठय़ा समयांची आरास असून या आठही अजस्र समया पेटल्यावर संपूर्ण मंडप प्रकाशानं उजळून निघतो.
यानंतर पुढे गेल्यावर लागतो मुदाली पिल्लारी मंडप. मुदलियार याने बांधलेला हा मंडप तेथील गोपुर व चित्रं यामुळे आकर्षणाचं ठिकाण ठरला आहे. इथं एका दगडात कोरलेले मुरुगन, कदंथाई व मुदलियार चितारले आहेत. याशिवाय या मंडपात बिक्षादन, थारुगवन व मोहिनी यांच्या आकृती अतिशय सुंदर आहेत. इथली सर्व शिल्पंही अप्रतिम आहेत.

स्वर्णकमल पुष्करिणी असून साक्षात इंद्र पापमुक्तीसाठी या पवित्र जलात स्नान करून इथं उगवणाऱ्या सुवर्णकमलांनी शिवपूजा करीत असे असं मानलं जातं. या अतिशय मोठय़ा तलावाभोवती भव्य भिंत व पायऱ्या असून घाट व प्राकारही आहे. तिसऱ्या तमीळ कवींच्या संगमातील सर्व कवींची शिल्पं इथल्या खांबांवर कोरलेली आहेत. याशिवाय ज्या धनंजयन् या व्यापाऱ्याने मूळ स्वयंभू शिवलिंगाचा शोध लावला. त्याचे व कुलक्षेत्र पंडय़ान- ज्याने शहर व प्रथम मंदिर बांधलं त्याचं, अशी दोन्ही शिल्पं खांबावर आहेत.

पूर्व व उत्तरेकडच्या भिंतीवर पौराणिक कथाचित्रं दिसतात, तर पूर्वेकडून प्राकाराकडे पाहिल्यास श्रीमीनाक्षी व सुंदरेश्वरस्वामी यांच्या दोन स्वतंत्र मंदिरांची शिखरं दिसतात. इथंच दक्षिण प्राकाराच्या भिंतीवर थिरुक्कुरल या प्रसिद्ध तमीळ संतकवीची कवनं एका विशिष्ट प्रकारच्या दगडावर कोरलेली आहेत. स्वर्णपद्म सरोवराजवळच संगमरवरी कट्टा असून त्यावर श्रीमीनाक्षी व सुंदरेश्वरस्वामी यांच्या संपूर्ण सोन्यात बनविलेल्या भरीव मूर्ती दर शुक्रवारी पूजेसाठी ठेवल्या जातात.

इथल्या छतावर मुरुगेशाच्या सहा जागृत स्थानांची रंगीत चित्रं आहेत व गच्चीत राणी मंगम्मा व मंत्री रामप्पयन् यांची शिल्पं ठेवली आहेत. जवळच किलिकोट्ट हा मंडप आहे. तिथं पिंजऱ्यामधील पोपटांची शिल्पं व लांबच लांब अशी अनेक खांबांची रांग आहे. त्यावरील नक्षीकाम व उत्तम कारागिरी यामुळे या मंडपाची शोभा द्विगुणित होते. इथंच पाच पांडव, वाली, सुग्रीव व द्रौपदी यांचे दगडात कोरलेले पुतळे आहेत. बाजूलाच राज्याभिषेक व विवाह सोहळ्याची मोठी व अतिशय सुंदर चित्रं आहेत. यामुळेही या मंडपाच्या शोभेत भर पडते. इथल्या छातावरही चकित करणाऱ्या शिल्पकृती आहेत.

श्रीमीनाक्षी देवीचे मंदिर
या मंदिरसमूहाच्या आवारातील अत्यंत महत्त्वाचं व मुख्य मंदिर आहे श्रीमीनाक्षीदेवीचे मंदिर. सुरुवातीलाच सुवर्णध्वज स्तंभ व त्याआधी तीन मजली स्वतंत्र गोपुर आहे. त्यापुढे नायक मंडप, द्वारपालांच्या पितळी मूर्ती व विनायक असून कुदल कुमारासाठी उपमंदिर आहे. इथंच भिरुपुगाल काव्य भिंतीवर कोरलेलं आहे. याशिवाय भव्य महामंडप, राजनिद्रालय, अर्थ मंडप, आर्यावर्त विनायक व जवळच मुख्य गर्भगृह आहे. त्यात करुणेचा सागर असलेल्या मीनाक्षीदेवीची हातात पोपट व पुष्पगुच्छ घेतलेली अत्यंत आकर्षक मूर्ती आहे.
इथून पुढे येऊन किलिकुट्टू मंडपाकडून उत्तरेकडे वळल्यावर दक्षिणमुखी मुक्कुरनी विनायकाची सुबक अशी दगडी मूर्ती आहे. थिरुमूर नायक जमीन खणत असताना ही आठ फूट उंचीची विनायक मूर्ती सापडली होती. इथंच संगमकाळातील ज्ञानसंबंध व नटराज यांची स्वतंत्र अशी उपमंदिरं आहेत.

पुढे राय गोपुराचं अर्धवट केलेलं काम व चबुतरा दिसतो. त्याचा आकार पाहिल्यावर असं वाटतं की, हे गोपुर जर पूर्ण झालं असतं तर ते कदाचित जगातलं सर्वात उंच व सर्वात मोठं गोपुर ठरलं असतं. कंबथाडी या पुढील मंडपातील मूर्ती व शिल्पं यांचं सौंदर्य पराकोटीचं असून या मंडपाच्या मध्यावर सोन्याचा ध्वजस्तंभ, नंदी व मोठं बलीपीठ आहे.

आठ मोठय़ा खांबांवर शिवाचे आठ अवतार कोरलेले आहेत. बाजूच्या खांबांवर विष्णूचे अवतारही आहेत. मीनाक्षी विवाहाचा प्रसंग अतिशय सुंदर कोरला आहे. याशिवाय अग्निवीर भद्र, अहोरावीर भद्र यांच्या भव्य मूर्ती, कलीशिव व ऊध्र्व तांडव करतानाच्या मूर्ती या आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असलेल्या व अत्यंत कलापूर्ण आहे. कंबथाडी मंडप हे एक मूर्तिसंग्रहालयच वाटते.

श्रीसुंदरेश्वरस्वामी मंदिर
या परिसरातील दुसरे प्रमुख मंदिर श्रीसुंदरेश्वरस्वामींचे आहे. या मंदिरासमोर बारा फूट उंचीचे अजस्र द्वारपालक आहेत. इथं सहा खांबांवर एक चबुतरा बनविला आहे. त्याचं पौराणिक महत्त्व आहे. इथंच तिरुविलायडल हे तमीळमधलं अत्यंत महत्त्वाचं पुराण वाचलं गेलं अशी श्रद्धा आहे. याशिवाय इथं सरस्वतीदेवी, काशी विश्वनाथ (लिंग), भिक्षादनार, ६३ संत, अठरा सिद्धमुनी, दुर्गा व उत्सवमूर्ती यांचे भव्य पुतळे आहेत.

उत्तरेला अजस्र असा कदंब वृक्ष आहे. हा प्राचीन मानला जातो. यापुढे कनकसभा, यज्ञशाळा व वन्नी हा स्थळवृक्ष असून पुढे प्राकार आहे. इथं उजवा पाय वर उचलून घेतलेली नटराजाची मोठी मूर्ती आहे. त्यापुढे या मंदिरातील मुख्य असे सुंदरेश्वरस्वामीचे मोठे व शिवाचे ६४ भूतगण तसेच बाजूला आठ हत्ती, बत्तीस सिंह व जवळच मोठे शिवलिंगही आहे. हाच सुंदरेश्वरस्वामी होय. यालाच चोक्कनाथ वा कर्पूरचोक्कर असंही म्हणतात.

सहस्रस्तंभ मंडप
सुंदरेश्वरस्वामी सन्निधीकडून या हजार खांबी मंडपाकडे आल्यावर लक्षात येतं की, अरियानाथ मुदलियारनं बांधलेला हा मंडप कलाकृतींचा खजिनाच आहे. दोन्ही बाजूंनी शिल्पकृती, छतावर ६४ तामीळ वर्षदर्शक चक्रांचं कोरीव काम, एका सुतात बसविलेले हजारापैकी ९८५ उंच, कोरीव कलायुक्त सुबक अखंड दगडातले खांब हे सर्व अद्भुत आहे. विशेष म्हणजे हे खांब अशा रीतीने बसविले आहेत की, ते कोठूनही पाहिले तरी एका सरळ रेषेतच दिसतात. अर्जुन, मोहिनी, मन्मथ, कालीपुरुष, राही, एक जुनं दुर्मीळ वाद्य वाजविणारी स्त्री ही सर्व अस्सल ग्रॅनाइटमधली शिल्पं अत्यंत रेखीव व मनमोहक आहेत. मंडपाच्या एका टोकाला मोठी, पण आकर्षक अशी नटराजाची मूर्ती आहे. याशिवाय बऱ्याच प्राचीन वस्तू, मूर्ती व अनेक आकर्षक गोष्टी इथं पाहावयास मिळतात.

हजार खांबी मंडपाच्या पुढे दक्षिणेकडे मंगायार्करसी हा नव्याने निर्माण केलेला असून, त्यात कूनपंडियान, मंगायार्करसी, ज्ञानसंबंधर व एक शिवलिंग हे सर्व खुबीने बसविले आहेत. या सर्व मूर्ती व शिवलिंग अत्यंत चित्ताकर्षक आहे. आदिविथी नावाच्या रस्त्यानं वेढलेल्या या मंदिर समूहाच्या एकंदर शोभेत भर घातलीय ती १९० फूट उंचीच्या चार दिशांच्या चार गोपुरांनी. १६ व्या शतकात बांधलेलं दक्षिण गोपुर १६० फूट उंच, पूर्वेकडलं १३ व्या शतकात मरवर्मन् सुंदर पंडय़ान याने, तर पश्चिमेकडे गोपुर १४ व्या शतकात पराक्रम पंडय़न याने बांधलं. सर्वात जुनं पूर्वेकडचं गोपुर हे सर्वात उंच आहे व उत्तरेकडचं म्हणावं तसं तुलनेनं कलात्मक वाटत नाही.

सांगीतिक स्तंभ
या मंदिराचं हे एक खास असं वैशिष्टय़ आहे. उत्तरेकडील गोपुराकडून आतल्या बाजूला एका मंडपात हे एकूण पाच स्तंभ आहेत. त्या प्रत्येक स्तंभाला २२ छोटे उपस्तंभ वा खांब आहेत. हे विशिष्ट प्रकारच्या नाद येणाऱ्या दगडाचे असून त्या स्तंभांवर अलगद काठी मारल्यास मृदंग, सतार, इ. पाच वाद्यांच्या सप्तस्वरांचे आवाज येतात. विशेष म्हणजे हे छोटे स्तंभही एकाच दगडात आहेत. त्या प्रत्येकाचे नाद भिन्न आहेत. पाच खांबांमध्ये पाच वेगळ्या वाद्यांचे नाद येतात. विशेष म्हणजे हे खांबांचे दगड खाणीत असताना आवाज/ नाद येतो, पण मूळ स्थानापासून वेगळे केल्यावर तो नाद बंद होतो. मग हे दगड वापरून कोणत्या अद्भुत तंत्राने त्यातील नाद टिकवला व एकाच दगडात सप्तस्वर कसे निर्माण केले, हा एक संशोधकांना अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. जम्मूजवळ हिमालयात असे दगड सापडतात असं माहीतगार सांगतात.

पूर्वेकडील गोपुरासमोरील मंडप हा पुथु वा वसंत मंडप होय. ग्रीष्म ऋ तूत मीनाक्षीदेवी व सुंदरेश्वरस्वामी यांना विश्रामासाठी हा बांधला गेला आहे. उत्सवामध्ये ग्रॅनाइटच्या चबुतऱ्यावर देवतांच्या मूर्ती ठेवल्या जातात. इथं थडथगई व मीनाक्षीदेवीच्या विवाहाच्या प्रसंगाची मूर्ती आहे. त्याशिवाय रावण कैलास उचलताना व हत्ती ऊस खातानाची शिल्पं दगडामध्ये कोरली आहेत. या शिल्पांचं सौंदर्य हे नायक राजघराण्याची आठवण वर्षांनुवर्ष देत राहील.

या मंदिरसमूहातील अनेक शिल्पं कायम आठवणीत राहण्यासारखी आहेत. उदा. मुख्य गर्भगृहाबाहेरील अनेक मूर्ती, मीनाक्षी विवाह शिल्प, कन्यादान करताना विष्णू, जो तिचा भाऊ म्हणून दाखविला आहे, स्वतंत्र चौकटीवर व दगडी मंडप करून बसविलेला कातीव कोरीव नंदी हा तर काळ्याशार दगडात असून तो जिवंत वाटतो. मंडप हा दगडाचा असला तरी शिसवी वाटतो व ही सर्व शिल्पं एकाच अखंड दगडातील आहेत. या संग्रहात ब्राँझ धातूचे व काही हस्तिदंती पुतळेही आहेत.

मीनाक्षी मंदिराची आख्यायिका :
पौराणिक कथेनुसार मीनाक्षी ही तीन वर्षांची मुलगी ‘यज्ञ’ म्हणजेच पवित्र अग्नि पासून उदयास आली. ‘कथनमलाई’ या नावाच्या एका राजाने आपली पत्नी कांचनमलाई यांच्याबरोबर मल्याध्वजा पंड्या नावाच्या राजाने यज्ञ सादर केला. राजघराण्याला कोणतीही मुले नसल्यामुळे राजाने भगवान शिव यांना प्रार्थना केली व त्यांना मुलगा द्यावा अशी विनंती केली.
पवित्र अग्नीतून एक तीन स्तनधारी मुलगी उदयास आल्या . जेव्हा मल्याध्वज आणि त्याच्या पत्नीने मुलीच्या असामान्य देखाव्याबद्दल चिंता व्यक्त केली, तेव्हा दैवी वाणीने त्यांना मुलीच्या शारीरिक स्वरुपाकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले. तिला असेही सांगितले गेले होते की मुलीच्या तिसर्या स्तन तिच्या भावी पतीला भेटताच अदृश्य होतील. मुक्त झालेल्या राजाने त्याचे नाव मीनाक्षी ठेवले आणि थोड्या वेळातच त्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. मीनाक्षीने प्राचीन काळातील मदुराई शहरावर राज्य केले आणि शेजारच्या राज्यांवरही कब्जा केला.

पौराणिक कथेत असे आहे की त्यांनी इंद्रलोक (जे भगवान इंद्राचे घर होते) आणि भगवान शिव यांचे निवासस्थान कैलाश यांच्या वरही कब्जा केला . जेव्हा शिव तिच्या समोर येतो, तेव्हा मीनाक्षीचा तिसरा स्तन अदृश्य होते. शिव आणि मीनाक्षी तिचे लग्न ठरलेल्या मदुराईला परतले. असं म्हणतात की या लग्नात सर्व देवी-देवतांनी हजेरी लावली होती. पार्वतीने स्वतः मीनाक्षीचे रूप धारण केले असल्याने भगवान विष्णू, पार्वतीचा भाऊ ,भगवान शिव यांच्याकडे सोपविण्यात आला. आजही दरवर्षी हा विवाह सोहळा “चित्तीराय तिरविझा” म्हणून साजरा केला जातो, ज्याला तिरुकल्याणम (भव्य विवाह) देखील म्हणतात.

” दहा दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या तिरुकल्याणम उत्सवात या मंदिरात एक लाखाहून अधिक भाविक येतात. दररोज बरीच लोक भेट देतानाही मंदिराची देखभाल केली जाते आणि भारतातील ह्या मंदिराला ‘बेस्ट क्लीन आयकॉनिक प्लेस’ असे नाव दिले जाते. एवढय़ा मोठय़ा व सतरा एकरांवर पसरलेल्या वास्तुवैभवाची योग्य देखभाल, ना कुठे ढासळणं, ना अस्वच्छता, ना बेफिकिरी व सर्व बाबतीत नेटकेपणा व शिस्त हे सारं निखळ श्रद्धेपोटीच होतं असं काही नव्हे. ते दाखवत असलेली निष्ठा आस्था, आपुलकी व अभिमान यापासून आपल्याला बरंच काही शिकता येईल.

‘मीनाक्षी अम्मन मंदिराचे महत्त्व आणि पूजा :
मीनाक्षी ह्या मंदिरातील मुख्य देवता असल्याने, मंदिर तामिळ हिंदू कुटुंबातील स्त्रीचे महत्त्व दर्शवते. या मंदिरात शैव, वैष्णव आणि शक्तीवाद यांच्यातील सौहार्दपूर्ण नाते देखील दर्शविले गेले आहे. सुंदरेश्वर तीर्थ हा ‘पंच सबई’ (पाच दरबार) चा पाचवा भाग म्हणून ओळखला जातो जिथे भगवान शिव यांनी वैश्विक नृत्य केले असा विश्वास आहे.
पूजेमध्ये मुख्यत: विधी आणि मिरवणुका असतात. एका विधीमध्ये पालखीच्या आत सुंदरेश्वरची प्रतिमा ठेवण्याची प्रथा आहे ज्याला नंतर मीनाक्षी मंदिरात नेण्यात आले. पालखी दररोज रात्री मंदिरात नेली जाते आणि दररोज सकाळी सुंदरेश्वरच्या मंदिरात परत आणली जाते. भक्त लोक सहसा सुंदरेश्वरची पूजा करण्यापूर्वी मीनाक्षीची पूजा करतात.

उत्सव आणि सण :
मुख्य उत्सव जो मुळात देवतांचा विवाह सोहळा असतो, त्याशिवाय इतरही अनेक सण मंदिरात साजरे केले जातात. यापैकी काही ‘वसंत उत्सव,’ ‘अंजली उत्सव,’ ‘मूलई-कोट्टू महोत्सव,’ ‘अरुधर्म धर्म उत्सव,’ ‘थाई,’ ‘कोलट्टम उत्सव,’ ‘इत्यादी प्रत्येक उत्सवाचे स्वतःचे महत्त्व आहे. आणि ते साजरा केला जातो. वर्षभरात वेगवेगळ्या महिन्यांत मंदिरात ‘नवरात्र उत्सव’ साजरा केला जातो. ‘नवरात्र’ दरम्यान मंदिरात रंगीबेरंगी बाहुल्या दिसतात, ज्याला एकत्रितपणे गोलू म्हणतात. ‘गोलू’ अनेकदा पौराणिक दृश्यांमधून कथा व्यक्त करतो.

Worlds Largest Temple Madurai Meenakshi Temple by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हरणांची शिकार करुन मास विक्री; मालेगावमध्ये तिघे पोलिसांच्या ताब्यात

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा ज्योतिषाकडे जातो…

India Darpan

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - नवरा ज्योतिषाकडे जातो...

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011