रविवार, नोव्हेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हे आहे जगातील सर्वात विशाल मंदिर… तब्बल २४६ हेक्टरवर आहेत ५१८ मंदिरे… सोन्याचा नंदी आणि अप्रतिम वास्तुकला…

नोव्हेंबर 13, 2022 | 9:42 pm
in इतर
0
Pashupatinath temple

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातील सर्वांत मोठे मंदिर -१
नेपाळचे श्रीपशुपतीनाथ मंदिर!
(क्षेत्रफळ २४,६०,००० स्क्वेअर मीटर)

नेपाळची राजधानी काठमांडू जवळचे श्रीपशुपतीनाथ हे जगातले सर्वांत विशाल, भव्य, मोठे हिंदू मंदिर असून २४६ हेक्टर जागेवर पसरलेल्या या मंदिर समुहांत ५१८ मंदिरांचा समावेश आहे. पशुपतिनाथ मंदिर नेपाळ मधील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर वसलेले शिव मंदिर आहे.’जगभरातील मोठी मंदिरं’ या विशेष मालिकेत आज ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांना सर्वप्रथम नेपाळमधील विख्यात श्री पशुपतीनाथ मंदिराचा परिचय करुन देणार आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

सर्वाधिक हिंदू मंदिरं आपल्या भारतात आहेत. ही मंदिरं केवळ प्रार्थनास्थळंच नाहीत तर आपली संस्कृती, संस्कारांची जपणूक आणि विकास करणारी केन्द्रं आहेत. मंदिरं बांधण्याचे अतिशय प्रगत वास्तुशास्त्र फार प्राचीन काळी आपल्याकडे विकसित झाले होते, विशेष म्हणजे आपल्या देशांतच आपल्या देवांची मोठ मोठी कलाकुसरयुक्त मंदिरं आहेत असे नाही तर हिंदू संस्कृतीचा हा संपन्न ठेवा जगभर पसरलेला आहे.
सर्वाधिक जागा व्यापणारी म्हणजे ज्यांचे क्षेत्रफळ मोठे आहे या निकषानुसार जगातील दोन सर्वांत विशाल मंदिरं परदेशांत आहे. ‘जगभरातील मोठी मंदिरं’ या विशेष मालिकेत आज ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांना सर्वप्रथम नेपाळमधील विख्यात श्री पशुपतीनाथ मंदिराचा परिचय करुन देणार आहोत.

जगातले सर्वांत विशाल हिंदू मंदिर
नेपाळची राजधानी काठमांडू जवळचे श्रीपशुपतीनाथ हे जगातले सर्वांत विशाल, भव्य, मोठे हिंदू मंदिर असून २४ लक्ष ६० हजार स्क्वेअर मीटर एवढ्या भव्य जागेवर विस्तारलेले आहे. २४६ हेक्टर जागेवर पसरलेल्या या मंदिर समुहांत ५१८ मंदिरांचा समावेश आहे. पशुपतिनाथ मंदिर नेपाळ मधील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर वसलेले शिव मंदिर आहे. पशुपतिनाथ मंदिरात सुमारे ४९१मंदिरे, १५ शिवालय – भगवान शिवांची मंदिरे आणि १२ ज्योतिर्लिंग आहेत.

जागतिक वारसा स्थळ
युनेस्कोने इ.स. १९७९ मध्ये हे मंदिर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे. विशेष म्हणजे पशुपतीनाथ मंदिर हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक आहे. जांबूद्वीप क्षेत्रावरील तामिळ पादल पेट्र स्थलम म्हणजे महादेवाच्या २७५ पवित्र शिवलिंगापैकी एक आहे. शिव पुराणातील कोटिरुद्र संहितेच्या अकराव्या अध्यायात याचा उल्लेख ‘उत्तरे कडील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे शिवलिंग आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. त्याकाळी पशुपति ही नेपाळची राष्ट्रीय देवता तथा आराध्य दैवत होते. पशुपतिनाथ मंदिराजवळ गुहेश्वरीचे म्हणजेच पार्वतीचे मंदिर आहे येथे बागमती नदीच्या काठी बांधलेल्या घाटांवर हिंदूंचे अंत्यसंस्कार केले जातात.काशी प्रमाणे येथे मृत्यु झाला वा अंत्यसंस्कार केल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून सुटका होते अशी मान्यता आहे.

सोन्याचा नंदी
विशेष म्हणजे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातुन फक्त हिंदूंनाच आत येण्यास परवानगी आहे. मंदिराच्या प्रमुख गर्भाशयात एक शिवलिंग आहे आणि त्याच्या समोर भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीची सर्वात मोठी सोन्याची मूर्ती आहे. मंदिर संकुलामध्ये शेकडो शिवलिंग आहेत. येथील महा शिवरात्रोत्सव नेपाळ आणि भारता प्रमाणेच जगभरातील लाखो भाविकांना आकर्षित करतो. बागमती नदीच्या काठावर काठमांडूच्या उत्तर-पश्चिम दिशेला 3 कि.मी. अंतरावर देवपतन, जया बागेशोरी, गौरीघाट, कुतुंबल, गौशाला, पिंगलस्थान आणि शेषमंतक जंगल ही प्रेक्षनीय स्थळं आहे.

मंदिराचा मनोरंजक इतिहास
पशुपतिनाथ मंदिराच्या बांधकामाचा कालावधी नक्की ठावुक नसला तरी पशुपतिनाथ हे काठमांडूमधील सर्वात प्राचीन मंदिर आहे. इतिहासानुसार, मंदिर ई.स.पू. तिसऱ्या शतकात सोमदेव घराण्याच्या पशुप्रक्षेने बांधले होते. पशुपतीनाथ मंदिराचा मुख्य परिसर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला गेला होता, नरेश भूपलेंद्र मल्ला यांनी इ.स.१६९७ मध्ये मंदिराला सध्याचे स्वरूप दिले असे म्हणतात.

मंदिराची वास्तुकला 
पशुपतिनाथ मंदिराचा मुख्य परिसर नेपाळी पागोडा आर्किटेक्चरल शैलीमध्ये बांधण्यात आला आहे. मंदिराचे छत तांब्याचे असून त्यावर सोन्याने मढवले आहेत. तसेचमंदिराचे प्रमुख दरवाजे चांदीच्या पत्र्यांनी सुशोभित करण्यात आलेले आहेत. या मंदिराला एक सोन्याचे शिखर असून ते ‘गजूर आणि दोन गर्भगृह’ या नावाने ओळखले जाते.. आतील गर्भगृहात भगवान शिवची मूर्ती स्थापित केलेली आहे. गाभार्या बाहेर कॉरिडॉरसारखी मोकळी जागा आहे. मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे पशुपतीनाथा समोर असलेली नंदी बैलाची विशाल सुवर्णमूर्ती. भगवान शिवाचे वाहन असलेला इथला विशाल नंदी संपूर्ण सोन्याचा आहे.

पंचमुखी शिव लिंग
पवित्र गर्भगृहात, मुख्य मूर्ती दगडी मुखलिंग आहे. हे शिवलिंग एक मीटर उंच असून त्याला चार दिशांना चार चेहेरे आहेत. हे चेहरे पृथ्वी, पाणी, हवा, प्रकाश आणि ईथर या पाच प्राथमिक घटकांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक चेहऱ्यावर लहान पसरलेले हात असून उजव्या हातात रुद्राक्षाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. भारत आणि नेपाळमधील इतर शिवलिंगांप्रमाणे हे पशुपती शिवलिंग नेहमीच सोन्याच्या वस्त्रात परिधान केलेले असते. अभिषेकासाठी दूध आणि गंगाजल वापरले जाते, जो केवळ मुख्य पुजाऱ्यांमार्फतच केला जातो.
पशुपतीनाथाचे मुख्य मंदिर परिसर आणि गर्भगृह अभंग राहिले होते. परंतु जागतिक वारसा स्थळातील काही बाह्य इमारती एप्रिल २०१५ च्या नेपाळ भूकंपामुळे खराब झाल्या.

पशुपतिनाथ उत्पत्तीच्या आख्यायिका
पशुपतिनाथाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. हे भगवान पशुपतिनाथाचे मंदिर कसे अस्तित्वात आले याचे वर्णन करणाऱ्या अनेक आख्यायिका आहेत.
एक कथा अशी आहे की, शिव आणि पार्वती फिरतफिरत काठमांडू खोऱ्यात आले आणि विश्रांतीसाठी बागमतीजवळील जंगलात विसावा घेतला. शिव जंगल आणि सभोवतालच्या परिसराच्या सौंदर्याने इतके मोहित झाले की ते आणि पार्वती हरणात रूपांतरित होऊन जंगलात भटकू लागले. काठमांडू खोऱ्यातील अनेक ठिकाणे अशी ठिकाणे म्हणून ओळखली गेली आहेत जिथे शिव त्याच्या काळात हरीण म्हणून गेले होते. काही काळाने ब्रह्मदेव आणि इतर देवता शिवाचा शोध घेऊ लागले. शेवटी एकदाचे त्यांना शिव या जंगलात सापडले. देवता तर खुश झाल्या परंतु शिवाने जंगल सोडण्यास नकार दिला. शेवटी भगवान शिवाने जाहीर केले की, तो बागमती नदीच्या काठी हरणाच्या रूपात राहत असल्याने, त्याला आता पशुपतिनाथ म्हणजे ‘सर्व प्राण्यांचा देव’ म्हणून ओळखले जाईल. असं म्हटलं जातं की जो कोणी इथे आला आणि येथील शिवलिंगाचे दर्शन आणि पूजन केले तो परत प्राणी म्हणून कधीही पुनर्जन्म घेणार नाही.

दुसऱ्या एका आख्यायिके नुसार जेव्हा महाभारताचे युद्ध संपले तेव्हा तेथील प्रचंड जीवितहानी आणि आपल्या काही प्रिय भक्तांचा विनाश पाहून भगवान शिव अत्यंत दुःखी झाले. आपले मन रमवण्यासाठी ते गुप्तरूपांत केदारनाथ येथे राहू लागले. जेव्हा स्वर्गारोहणाची वेळ आली तेव्हा पांडवांना निष्कांटक स्वर्गात प्रवेश मिळावा म्हणून भगवान श्री कृष्णाने त्यांना शिव दर्शनाचा सल्ला दिला. शिवाला शोधत शोधत पांडव केदारनाथला आले. एका म्हशीच्या कळपात शिवजी रेडा बनून लपले होते, परंतु शेवटी भीमाने शिवाला ओळखलेच. यामुळे रेडा रुपी शिव तिथेच जमिनीत घुसले. त्यावेळी भीमाने त्यांना शेपटी धरून पकडून ठेवले. हाच शेपटीवाला पार्श्वभाग केदारनाथ तर जमिनीतून दूर नेपाळमध्ये बाहेर पडलेले मुखाचा भाग पशुपतिनाथ म्हणून ओळखले जाते अशी आख्यायिका आहे..

मंदिर अभिषेक :
पशुपतिनाथ मंदिरात सकाळी 9 ते 11 या दरम्यान अभिषेक होतो. यावेळी, मंदिर उघडले जाते. अभिषेकसाठी भाविकांना 1100 रुपयांची पावती फाडावी लागते.यात रुद्राभिषेक यांच्यासह अनेक पुजाविधिंचा समावेश आहे. विशेष म्हणजे अभिषेक त्याच दिशेने केला गेला आहे ज्यात देवताचा चेहरा दिसत आहे. मंदिरात अभिषेकसाठी कोणती ओळ वापरायची हे तिकिटात लिहिलेले असते. तिकिटावर पूर्व लिहिले असेल तर भाविकांना पूर्व प्रवेशद्वारासमोर रांगेत उभे रहावे लागते. यावेळी, पुजारी शिवलिंगाच्या पूर्वेकडील चेहऱ्यावर अभिषेक करताल.
पशुपतीनाथ मंदिराची सर्वात विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मूर्तीला केवळ चार पुजारी स्पर्श करतात. दोन पुजारी मंदिरात दररोज धार्मिक विधी करतात, त्यातील पहिले भंडारी आणि दुसर्‍याला भट्ट पुजारी म्हणतात. भट्ट हे एकमेव पुजारी आहेत जे मूर्तीला स्पर्श करू शकतात आणि मूर्तीवर धार्मिक संस्कार करू शकतात, तर भंडारी मंदिराचे देखभाल करणारे आहेत.

साजरे होणारे उत्सव
पशुपतीनाथ मंदिरात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात आणि हजारो लोक या उत्सवात सामील होतात. महाशिवरात्र, बाळ चतुर्थी उत्सव आणि तीज उत्सव हे सर्वात महत्वाचे सण आहेत. तसेच तीशु हे पशुपतीनाथ मंदिरातील सर्वात प्रसिद्ध सण आहे.
भेट देण्यासाठी उत्तम वेळ :
वर्षातून कधीही पशुपतिनाथ मंदिरात भेट दिली जाऊ शकते. तथापि, महाशिवरात्रि, तीज आणि बाळ चतुर्थीच्या सणांच्या वेळी, मंदिरात भाविकांची सर्वाधिक गर्दी असते.
कसे जावे :
काठमांडूच्या हद्दीत वसलेले पशुपतिनाथ मंदिर सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीद्वारे सुलभ आहे. काठमांडू येथे सर्वात जवळचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बौद्धनाथ स्तूप येथून टॅक्सीने मंदिरात जाण्यास सुमारे 10 मिनिटे लागतात. थाईल स्ट्रीट आणि काठमांडू दरबार स्क्वेअर येथून टॅक्सीने मंदिरात जाण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागतीत. काठमांडूपासून फक्त 5 किमी अंतरावर पशुपतीनाथ मंदिर आहे. इथे बसेस , टॅक्सी आणि काठमांडूमधील सिटी बसेस देखील उपलब्ध असतात.

Worlds Largest Temple Features by Vijay Golesar
Nepal Pashupatinath Temple

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निवडणूक संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक

Next Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – १४ नोव्हेंबर २०२२

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
Happy birthday

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस - सोमवार - १४ नोव्हेंबर २०२२

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011