इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातले सर्वांत मोठे मंदिर – भाग -६
इंडोनेशियातील बेसाकिह मंदिर!
(क्षेत्रफळ १ लाख स्क्वेअर मीटर)
‘इंडिया दर्पण’च्या जगातील सर्वांत मोठे मंदिर या विशेष लेखामालेत आज आपण दोन लाख स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेल्या इंडोनेशियातील ‘बेसाकिह ‘ या मंदिराची माहिती घेणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
दक्षिण पूर्व अशिया आणि अशोनिया यांच्या मध्ये इंडोनेशिया नावाचा एक विशाल देश आहे. आज जरी इंडोनेशियात सर्वाधिक मुस्लिम लोकवस्ती असली तरी दोन तीन हजार वर्षांपूर्वी येथे हिन्दू संस्कृती नांदत होती, प्राचीन काळी या देशाचे नाव दीपान्तर होते. त्याकाळी येथे श्रीविजय राजवंश, शैलेन्द्र राजवंश, संजय राजवंश, माताराम राजवंश, केदिरी राजवंश, सिंहश्री राजवंश, मजापहित राजवंश, कितिनेगारा राजवंश आणि त्रिभुवना या हिंदूराजवंशाच्या राजांनी कित्येक शतके राज्य केले. पुढे मुस्लिम व्यापारी इंडोनेशियात आले. त्यांनी आपल्यासोबत इस्लाम धर्म आणला.आजच्या घडीला २७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात सर्वाधिक मुस्लिम वस्ती असली तरी हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माचा प्रभाव सर्वत्र जाणवतो. इथे माणसांची ,गावांची आणि स्थानांची नावे अरबी आणि संस्कृत भाषेत ठेवली जातात. विशेष म्हणजे आज देखील इंडोनेशियात पवित्र कुरान संस्कृत भाषेत वाचलं आणि शिकविलं जातं.
अशा या इंडोनेशियात सर्वांत जास्त हिंदू आणि बौध्द मंदिरं आहेत. इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर सर्वाधिक हिंदू मंदिरं असून त्याच ठिकाणी जगातले सहाव्या क्रमांकाचे सर्वांत मोठे हिन्दू मंदिर अनेक शतकांपासून अतिशय चांगल्या स्थितीत आहे. बेसाकिह नावाच्या या मंदिर समुहाला सर्व मंदिरांची माता असे म्हणतात. हे मंदिर केवळ इंडोनेशियातच नाही तर सगळ्या जगात सुंदर मंदिर म्हणून गणले जाते. ‘अगुंग’ नावाच्या एकाविशाल पहाडावर वसलेले हे मंदिर एखाद्या आयलैंड सारखे दिसते. त्याला ‘मदर टेम्पल ऑफ़ बेसाकिह’ याच नावाने ओळखले जाते. हे इंडोनेशियातील सर्वांत भव्य आणि पवित्र हिंदू मंदिर आहे. इंडोनेशियाच्या पारंपरिक वारशात या मंदिराचा समावेश केला जातो.
बेसाकिह मंदिरांत अनेक हिंदू देवी आणि देवतांच्या मूर्ती आहेत. इंडोनेशियातील हिंदूसाठी हे प्रमुख स्थान आहे त्यामुळे येथे प्रत्येक हिंदू सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक हिंदू देव आणि देवतां प्रमाणेच येथे वासुकी नागाची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. प्राचीन हिंदू ग्रंथांत वासुकी नागाचे वर्णन आहे. देव आणि दानव यांनी समुद्र मंथानाचे वेळी वासुकी नागाची मदत घेतली होती अशी आख्यायिका आहे. त्या वासुकी नागाचं येथे भव्य मंदिर आहे. किंबहुना या मंदिराचे नाव देखील वासुकी नागावरुनच ठेवलेले आहे असे म्हणतात. संस्कृत भाषेतील ‘वासुकी’ या शब्दावरूनच ‘बेसाकिह’हा जावानिज शब्द तयार झाला आहे.बेसाकिह या शब्दाचा अर्थ अभिनंदन असा होतो.
https://twitter.com/CucaBali/status/1608643138855522304?s=20&t=lcZGsChIEnDs69APTU1SVQ
ब्रह्मा,विष्णु, महेश
पूरा बेसाकिह मंदिरांत पेनाटरन अगुंग हे मध्यवर्ती मंदिर असून सात स्तरावर हे मंदिर वसविले आहे.मंदिरांत जाण्यासाठी १७०० पायर्या आहेत.मंदिरांत भगवान विष्णु, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांच्या मूर्ती आहेत. दरवर्षी पंधरा कोटिंपेक्षा अधिक पर्यटक या मंदिराला भेट देतांत असे सांगितले जाते. इंडोनेशियातले हे मंदिर आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे हिंदूंप्रमाणेच इथल्या रहिवाशांचेही आकर्षण केंद्र बनले आहे. येथील अनेक भक्त आणि पुजारी इंडोनेशियाचे पारंपरिक रहिवाशी आहेत.
मंदिर कुठे आहे?
इंडोनेशियातील पूर्व बालीच्या माउन्ट अगुंग या पर्वताच्या उतारावर बेसाकिह गावात हे मंदिर फार प्राचीन काळी बांधलेले आहे. मंदिराच्या उत्पत्तीविषयी खात्रीशिर माहिती उपलब्ध नाही परंतु प्राचीन काळापासून एक पवित्र मंदिर म्हणून हे स्थान पूजनीय आहे.
गुनुंग अगुंग किनार्यावर सुमारे १००० मीटर अंतरावर स्थित असलेल्या या मंदिरांत २३ मोठ मोठ्या मंदिरांचा समावेश आहे.यांत पूरा पेनाटरनअगुंग सर्वांत पवित्र आणि प्रमुख भाग आहे. अगुंग पर्वताच्या उतारावर सहा स्तरांवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार स्प्लिट गेटवे प्रकारचे असून त्यावर ‘कैंडी बेन्टॉर’ द्वार चित्रित केले आहे. त्याच्या पुढे दुसर्या प्रांगणाचे प्रवेद्वार आहे त्याला ‘कोरी अगुंग’ म्हणतात.
इ.स. १२८४ मध्ये हे मंदिर हिंदू भाविकांच्या पूजेत अग्रस्थानी होते. पंधराव्या शतका पर्यंत बेसाकिह हे मंदिर शक्तिशाली गेलगेल या हिंदू राजवंशाचे अधिकृत राजमंदिरम्हणून मान्यता पावले होते.
https://twitter.com/anamazingbali/status/1279112598936379392?s=20&t=lcZGsChIEnDs69APTU1SVQ
मंदिराचे आर्किटेक्चर
बेसाकिह हे मंदिर माउन्ट अगुंग या इंडोनेशियातील प्रमुख ज्वालामुखीच्या दक्षिण उतारावर वसलेले आहे . पुरा बेसाकिह हा २३ मंदिरांचा समूह आहे. जो पर्वताच्या समांतर रेषांवर स्थापन केलेले आहे.खरं तर हाच एक मानवी चमत्कार आहे. येथे प्रत्येक मंदिराचे छत आणि पायऱ्या चढत्या बनविल्या आहेत. मेरु संरचने सारखी ही रचना आहे. यालाच पुरा पेनाटरण असे म्हणतात. अध्यात्मिक क्षेत्रात एकेक पायरी वर चढावी अशी अपेक्षा यात असते.
चमत्कार
इ.स. १९६३ साली माउन्ट अगुंग च्या ज्वालामुखीचा प्रचंड स्फोट झाला होता. त्यावेळी १७०० व्यक्तींचा या उद्रेकांत मृत्यु झाला होता. त्यावेळी उकळत्या लाव्हारसाचा प्रवाह मंदिरा पासून केवळ एक मीटर अंतरावर येउन थांबला होता. बालीचेलोक याला चमत्कार मानतात. देवता आपल्या अफाट सामर्थ्याची जाणीव माणसांना करून देऊ इच्चिते मात्र देवांचे प्रतिक असलेले हे मंदिर नष्ट होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे हेच यातून प्रतीत होते असे मानतात. या मंदिरांत वर्षभरांत कमीत कमी ७० उत्सव साजरे केले जातात. येथील प्रत्येक मंदिराचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो.बालीच्या पावुकॉन कँलेंडरवर आधारित २१० दिवसांचे हे चक्र असते.
https://twitter.com/HolidayVillaNet/status/1252147655347593216?s=20&t=lcZGsChIEnDs69APTU1SVQ
-विजय गोळेसर
मोबाईल ९४२२७६५२२७
Worlds Largest Temple besakih Temple by Vijay Golesar
Indonesia Hindu Buddha