बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गेल्या शतकातील हे आहेत जगातील सर्वात मोठे देणगीदार; एवढे केले आहे त्यांनी दान

by India Darpan
सप्टेंबर 7, 2021 | 5:09 am
in संमिश्र वार्ता
0
DdODEcpVwAAtOx4

मुंबई – जगभरात अनेक अती श्रीमंत लोक असून अनेक सेवाभावी संस्थांना हे लोक वेळोवेळी देणग्या देऊन मदत करतात, अशा दानशूर लोकांची नेहमीच चर्चा होते. या यादीमध्ये काही भारतीयांचा देखील समावेश होतो. परंतु अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या 50 देणगीदार व्यक्तींच्या यादीमध्ये भारतातील उद्योगाचे जनक प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा समावेश आहे.

जोसेफ बेझोस किंवा बिल गेट्स यांचा जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये समावेश आहेत, परंतु हे दोघे भारतीय उद्योगाचे जनक आणि टाटा समूहाचे संस्थापक जमसेदजी टाटा यांच्यापेक्षा मोठे देणगीदार नाहीत. प्लेस्ट्रेमद्वारा शंभर वर्षांपासून जगातील सर्वात उदार देणगीदारांची यादी जाहीर करण्यात आली.

हरुन रिपोर्ट आणि एडेलगीव फाउंडेशनने तयार केलेल्या 50 जागतिक देणगीदारांच्या यादीमध्ये जामशेदजी टाटा यांना गेल्या 100 वर्षात जगातील सर्वात मोठा देणगीदार म्हणून निवडले गेले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या टाटा समूहाने सर्वाधिक 102 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 75 दशअब्ज 70 अब्ज 53 कोटी 18 लाख रुपये दान केले आहेत. या देणगीदारांच्या यादीमध्ये मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्व वस्तू बनवणारे टाटा समूहाचे टाटा देणगी देण्याच्या बाबतीत जगातील इतर उद्योगपतींपेक्षा खूपच पुढे आहेत.

या यादीत दुसर्‍या क्रमांकावर बिल गेट्स आणि त्यांची घटस्फोटित पत्नी मेलिंडा गेट्स असून त्यांनी 74.6 अब्ज डॉलर्सची देणगी दिली आहे. तर वॉरेन बफे 37.4 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या, जॉर्ज सॉरस 34.6 अब्ज डॉलर्ससह चौथ्या आणि जॉन डी रॉकफेलर 26.8 अब्ज डॉलर्ससह पाचव्या क्रमांकावर आहेत.विशेष म्हणजे जमशेदतजी यांनी आपली दोन तृतीयांश मालमत्ता ट्रस्टला दिली होती, ती अजूनही शिक्षण, आरोग्यासह इतर क्षेत्रात उपयोगात आणली जात आहे. त्यांनी 1892 पासूनच देणगी देणे सुरू केले होते. या यादीतील एकमेव दुसरे भारतीय उद्योगपती अजीम प्रेमजी असून त्यांनी जवळजवळ 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती दिली आहे.

फाउंडेशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले गेले आहे की, अल्फ्रेड नोबेलचे नाव 50 लोकांच्या यादीत नाही. अशी काही नावे नसली तरी ही आश्चर्यकारक गोष्ट नाही. अमेरिकन आणि युरोपियन देणगीदार गेल्या शतकात देणगी देण्यात आघाडीवर असले, तरीही टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी हे जगातील सर्वात मोठे देणगीदार आहेत. आजचे अब्जाधीश हे पैसे कमविण्याच्या पद्धतीने जास्त देणगी देत ​​नाहीत, असे हरुनचे अध्यक्ष आणि मुख्य संशोधक रुपर्ट हूगवर्फ यांनी म्हटले आहे.

या देणगीदारांच्या यादीत सर्वाधिक 39 लोक अमेरिकेन आहेत. या यादीत ब्रिटन दुसर्‍या क्रमांकावर असून 5 लोकांचा या यादीमध्ये आहेत. त्याचवेळी चीनमधील 3 लोक यात सामील आहेत. या यादीतील सर्वात मोठ्या देणगीदारांमध्ये 37 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर केवळ 13 लोक जिवंत आहेत. 50 देणगीदारांनी एकूण 832 अब्ज डॉलर्स दान केले. गेल्या 100 वर्षात या 50 लोकांनी एकूण 832 अब्ज डॉलर्स दान केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या गुप्तचर यंत्रणेला घाबरतात जगभरातील दहशतवादी संघटना; पण का?

Next Post

तालिबान राजवटीचा इफेक्ट: मनोरंजनाची जागा घेतली या कार्यक्रमांनी

India Darpan

Next Post
taliban

तालिबान राजवटीचा इफेक्ट: मनोरंजनाची जागा घेतली या कार्यक्रमांनी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011