इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात अनेक कार उत्पादक कंपनी असून वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या अत्याधुनिक कारची निर्मिती होत असते. परंतु प्रत्येकालाच आगळीवेगळी कार खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र जगातील सगळ्यात महागडी कार कोणती आहे, याचीही उत्सुकता सर्वांनाच असते. जगातील सर्वात महागडी क्लासिक कार कोणती असू शकते. याचा विचार केला तर Mercedes-Benz Silver Arrow 300 SLR सांगण्यात येते. त्याच्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत, या कारला जगातील सर्वात महागडी कार म्हटले जात आहे.
अधिकृतपणे मिळालेल्या माहितीनुसार, आता या कारचा लिलाव होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, ही कार खरेदी करण्यासाठी अनेक दिग्गज मोठ्या बोली लावू शकतात. त्यात Mercedes-Benz Silver Arrow 300 SLR ही जगातील सर्वात महागडी क्लासिक कार असण्याची अपेक्षा आहे.
हे आहे खास
1956 मर्सिडीज-बेंझ 300 SLR Uhlenhaut Coupe ची किंमत $142 दशलक्ष असू शकते, त्यामुळे ती जगातील सर्वात महागडी क्लासिक कार बनली. त्याची किंमत डझनभर Lamborghini Aventador Altimas आणि Ferrari 250 GTO खरेदी करण्यासाठी पुरेशी असू शकते. लवकरच ही कार लिलावासाठी दाखल होणार आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, प्रसिद्ध 300 SLR Uhlenhaut Coupe ही खरोखरच जगातील सर्वात महागडी क्लासिक कार बनली आहे.
सन1950 च्या दशकात दोन अतिशय प्रसिद्ध कार बनवण्यात आल्या होत्या. या दोन्ही कार 1955 मध्ये मर्सिडीजच्या रेसिंग सीननुसार तयार केल्या होत्या. दोन्ही कार इतक्या वर्ष मर्सिडीजच्या मालकीच्या होत्या आणि त्या जगातील सर्वात मौल्यवान कार म्हणून प्रसिद्ध होत्या. तथापि, गेल्या वर्षी काही निवडक कार संग्राहकांना स्टटगार्टमधील मर्सिडीज-बेंझ संग्रहालयात एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि तेव्हाच 300 SLR चे भवितव्य ठरले होते.
खरेदीदाराने वाहन निर्मात्याने निश्चित केलेल्या काही निकषांची पूर्तता करावी अशी मर्सिडीज-बेंझची इच्छा होती. यामध्ये कारची भविष्यातील काळजी सुनिश्चित करणे आणि खरेदीदाराने केवळ झटपट नफ्यासाठी कार विकू नये हे देखील समाविष्ट होते. याशिवाय, कंपनीला हे सुनिश्चित करायचे होते की, सिल्व्हर अॅरो रेसिंग कारचा कस्टोडियन मर्सिडीजने वर्षानुवर्षे जसा ठेवला आहे.
https://twitter.com/GoodwoodRRC/status/1529039503570178048?s=20&t=hAZMImzO6MsXenfke4h71A