पुणे – सध्याच्या काळात स्मार्टफोनमध्ये नानाविध प्रकार आणि आकार आले आहेत. काही लोकांना अत्यंत छोट्या आकाराचे स्मार्टफोन आवडतात. विशेषतः तरुण वर्गाचा छोट्या आकारातील स्मार्टफोनकडे विशेष कल दिसून येतो. सहाजिकच आता बाजारात स्मार्टफोनची क्रेज आहे. आपल्या कदाचित आश्चर्य वाटले परंतु जगातील सर्वात लहान 4G स्मार्टफोन चीनी बाजारात आला असून तो चक्क एटीएम कार्डपेक्षा कमी आकारात आहे.
हल्ली छोटया आकाराचे स्मार्ट फोन बाजारात असून ग्राहकांना ते आवडत आहेत. त्यातच 6.5 इंच डिस्प्ले असलेली उपकरणे बाजारात सामान्य झाली आहेत. चीनच्या एका कंपनीने जगातील सर्वात लहान 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनमध्ये फक्त 3 इंचाचा टच डिस्प्ले आहे. हा फोन मोनी या चीनी कंपनीने लाँच केला असून त्याला मोनी मिंट असे नाव देण्यात आले आहे. स्मार्टफोन लहान आणि वजनाने हलका आहे.
स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये
सदर स्मार्टफोन हा एटीएम कार्डपेक्षा लहान आहे. या फोनची बटणे आणि पोर्ट देखील लहान आकाराची आहेत. यात यूएसबी टाइप-सी पोर्ट, व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे आहेत. स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. एसडी कार्ड स्लॉटद्वारे स्टोरेज 164GB पर्यंत वाढवता येते. हा ड्युअल सिम स्मार्टफोन असून त्यामध्ये काही अॅप्स पूर्वीचीच आहेत.
रिचार्ज सोपे
मनी मिंट स्मार्टफोन हा प्रवास करताना सोबत नेणे खूप सोपे असून तो जगभरातील प्रमुख वायरलेस नेटवर्कला रिस्पॉन्स देतो. याव्यतिरिक्त, वायरलेस कॉलचा वापर देखील केला जाऊ शकतो, जिथे नेटवर्क कॉल करणे शक्य नाही. फोनमध्ये 1250mAh ची बॅटरी असून ती फुल चार्ज केल्यावर 3 दिवस टिकते.
किंमत
अन्य स्मार्टफोन प्रमाणे हा मनी मिंट स्मार्टफोन देखील किमतीत असून ग्राहकांना परवडणारा आहे. फोनची किंमत सुमारे 11 हजार रुपये आहे. अमेरिकन क्राउडफंडिंग वेबसाईट Indiegogo द्वारे तो खरेदी केला जाऊ शकतो. लवकर ग्राहकांसाठी ऑफर अंतर्गत, सुमारे 7,400 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या फोनची भारतात नोव्हेंबर 2021 पासून विक्री सुरू होईल.