नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त गेंड्यांच्या संरक्षणाविषयीच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी नागरिकांना भारतातील एक शिंगी गेंड्यांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास असणाऱ्या आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन केले.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले: “आज, जागतिक गेंडा दिनानिमित्त, आपण आपल्या वसुंधरेवरील सर्वात नामांकित प्रजातींपैकी एक – गेंड्याच्या संरक्षणासाठी आपल्या कटिबध्दतेचा पुनरुच्चार करूया. गेल्या अनेक वर्षांपासून गेंडा संवर्धनाच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन.
भारतामध्ये एकशिंगी गेंड्यांचा मोठ्या संख्येने अधिवास आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मी आसाममधील काझीरंगा येथील भेटीची आठवण करून देतो आणि तुम्हा सर्वांनाही तेथे भेट देण्याची विनंती करतो.”