इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या व्यक्तीची इच्छा शक्ती असेल, तर जगात काहीही पराक्रम किंवा विक्रम करू शकतो. त्याच्या इच्छाशक्ती पुढे कोणताही शारीरिक कमकुवतपणा आड येऊ शकत नाही. त्यामुळे दिव्यांगत्व किंवा अपंगत्व देखील पराक्रम करू शकतात, असे अनेक उदाहरणांवरून दिसून येते.
हेतू मजबूत असेल तर कोणतीही कमकुवतपणा त्यांच्या मार्गात येऊ शकत नाही. डॅन पार्करने हे खरे असल्याचे दाखवून दिले, कारण तो अंध असूनही 339 किलोमीटर वेगाने त्याने गाडी चालवून विश्वविक्रम केला आहे. पारकर यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. खरे तर दहा वर्षांपूर्वी रेसिंग करताना झालेल्या अपघातात पारकर यांना डोळे गमवावे लागले.
31 मार्च रोजी, पारकर यांनी 339.64 किमी प्रतितास वेगाने कार चालवून अंध व्यक्तीने सर्वात वेगवान कार चालविण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जिंकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दहा वर्षांपूर्वी 31 मार्च रोजीच रेसिंगदरम्यान झालेल्या अपघातात पारकर यांना डोळे गमवावे लागले आणि दहा वर्षांनंतर ३१ मार्च रोजी डोळ्यांशिवाय सर्वात वेगवान कार चालवण्याचा विक्रम त्यांनी केला.
दरम्यान, पारकर यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड ड्राइव्ह चॅलेंज अंतर्गत ऑडिओ मार्गदर्शन प्रणालीच्या मदतीने वाहनाचे व्यवस्थापन केले आणि जागतिक विक्रम केला. या आव्हानाचा उद्देश अंध व्यक्तींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रेरित करणे हा होता.
विश्वविक्रम केल्यानंतर पारकर यांनी संवाद साधताना सांगितले की, असे करून आम्ही केवळ अंध व्यक्तीही सावधपणे गाडी चालवू शकत नाही, तर ते 200 मैल प्रतितास वेगाने गाडीही चालवू शकतात हे दाखवून दिले. ‘मला आशा आहे की जगभरातील अंध व्यक्ती यापासून प्रेरणा घेतील आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अंध व्यक्ती वाहन चालवू शकतात किंवा आणखी पुढे जाऊ शकतात हे जगाला दिसेल.’