इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक जणांना विश्वविक्रम तथा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा छंद असतो. आपले नाव जगभरात व्हावे, यासाठी काही जण काहीही करायला तयार होतात. जगभरात अनेक प्रकारचे रेकॉर्ड होतात आणि दुसऱ्या व्यक्तीकडून ते मोडले जातात. या रेकॉर्ड्सची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाते. अनेकजण यात आपले नाव नोंदवण्यासाठी विविध प्रकारचे रेकॉर्ड्स करण्याचा प्रयत्न करतात. काही जण सर्वात लांब नखांचा विक्रम करत आहेत, तर काही जण सर्वात लांब दाढीचा विक्रम करतात. एका माणसाने तर कहरच केला, त्यांनी चक्क १०५महिलांशी विवाह केला. परंतु एकाच वेळी नव्हे तर वेगवेगळ्या वेळी हे प्रकार केले. पुर्वीच्या काळी राजे महाराजे अनेक विवाह करत असत, आधुनिक काळात या माणसाने हा एक प्रकारे वेगळाच विकृत पराक्रम केला होता, असे म्हणता येईल.
मौल्यवान वस्तू घेऊन
सध्याच्या काळात सोशल मीडियावरही अनेक वेळा अशा विविध चित्र विचित्र किंवा भन्नाट गोष्टी ऐकायला मिळतात. काही लोकांना तर यामुळे चांगली प्रसिद्धीही मिळते. जगभरात काही चांगले तर काही विचित्र विक्रम करणाऱ्यांच्या नावे विश्वविक्रमाचीही नोंद केली जाते. अमेरिकेमधील जिओव्हानी विग्लिओटो याने १४ देशांतील २७ राज्यांतील महिलांसोबत लग्न केले. विग्लिओटोने १०० हून अधिक महिलांसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक केली. त्यातील काही अमेरिकेमधील महिला होत्या तर काही अन्य देशांमधील महिलांचा समावेश होता, तो प्रत्येक वेळी लग्न करताना बनावट ओळखीचा वापर करायचा. तो प्रत्येक लग्नासाठी बनावट ओळखपत्र वापरत असे. लग्नानंतर जिओव्हानी पत्नीचे पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करत असे.
चोर बाजारातच भेटायचा
विशेष म्हणजे तो सर्व महिलांना चोर बाजारात भेटायचा आणि पहिल्या भेटीतच प्रपोज करायचा. तो महिलांना सांगत असे की, तो खूप दूर राहतो, त्यामुळे तुझे सर्व सामान घेऊन माझ्याकडे ये. जेव्हा स्त्रिया त्यांचे सर्व सामान बांधून ट्रकमध्ये भरायच्या, तेव्हा विग्लिओटो त्यांचे सामान घेऊन निघून जायचा आणि पुन्हा त्यांना कधीय भेटायचा नाही. चोरीचा सर्व माल तो चोर बाजारात विकायचा. आणि पैसे घेऊन फरार व्हायचा मी पुन्हा दुसरीकडे दुसऱ्या महिलेला फुसलावून तिचेही सामान लूबाडायचा.
यामुळे झाले निधन
विग्लिओटोनेविरुद्ध अनेक तक्रारी असूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, त्याचा शेवटचा बळी ठरलेल्या महिलेने त्याला अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये पकडले. शेरॉन क्लार्क असे या महिलेचे नाव असून ती इंडियानाच्या चोर मार्केटमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सन १९८१ विग्लिओटोला पकडले. त्यानंतर १९८३ मध्ये त्याच्याविरुद्ध खटला होऊन त्याला एकूण ३४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. यासोबतच त्याला ३ लाख ३६ हजार डॉलर्स चा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचे १९९१ मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे निधन झाले. मात्र जिओव्हानी विग्लिओटोने लग्न केलेल्या महिलांपैकी फारच कमी महिलांना त्याच्याबद्दल पुरेशी माहिती होती. बहुतेक महिला त्याला नीट ओळखतही नव्हत्या. त्यामुळे या महिलांनी पुन्हा दुसऱ्या पुरुषांबरोबर निश्चितच लग्न केले असावे.
World Record 107 Marriages within 32 years Guinness