बागेश्री पारनेरकर आणि सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आज २३ मार्च म्हणजे जागतिक हवामान दिवस. मानवी जिव्हाळ्याचा विषय म्हणून हवामानाकडे पाहिले जाते. जगभरात आज हवामान दिन साजरा होत आहे. या दिवशी जागतिक हवामान विभागतर्फे एक घोषवाक्य दिले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे ‘त्वरित सूचना आणि तात्काळ उपाय’. म्हणजेच हवामान बदलाचा अभ्यास करताना मिळालेल्या इशाऱ्यांच्या आधारे त्वरित निर्णय घेऊन जीवित आणि वित्तहानी वाचवण्याचा प्रयत्न करणे.
वेगवेगळ्या उपकरणाच्या माध्यमातून हवामानातील बदल तसेच अन्य नोंदी हवामान विभागातर्फे ठेवल्या जातात. नाशिकला पेठरोड येथे हवामान विभागाचे केंद्र आहे. या ठिकाणी कशा प्रकारे काम केले जाते, कोणकोणती उपकरणे तेथे आहेत, त्याचा सर्वसामान्यांना नक्की काय आणि कसा फायदा होतो, हे आपण जाणून घेणार आहोत नाशिक हवामान केंद्राच्या सायंटिफिक असिस्टंट वैशाली वडनेरकर यांच्याकडून…
#जागतिकहवामानदिन #हवामानदिन #भारतीयहवामानशास्त्रविभाग #नाशिकहवामान #इंडिया दर्पण #WMD #WorldMeteorologicalDay #IndianMeteorologicalDepartment #IMD #NashikWeather #Weather #Climate #IndiaDarpan