मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रावण मास विशेष… येथे आहे चक्क पाण्याचे शिवलिंग… १८०० वर्षांपूर्वीची अप्रतिम वास्तूकला… जगातील सर्वात मोठे मंदिर…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 22, 2023 | 5:12 am
in इतर
0
E7mCWCCVIAIr0Zh e1681048222532

जगातील सर्वांत मोठे मंदिर
पाण्याचे शिवलिंग असलेले
त्रिचनापल्लीचे जम्बुकेश्वर मंदिर
(क्षेत्रफळ ७२,८४३ चौ.. फुट)

जगातील सर्वांत मोठे मंदिर या इंडिया दर्पणच्या विशेष लेखमालेत आज आपण जम्बुकेश्वर मंदिराचा परिचय करुन घेणार आहोत.
तामिळनाडुतील त्रिची किंवा त्रिचनापल्ली येथे थिरुवनैकवल किंवा जम्बुकेश्वरम नावाचे सुप्रसिद्ध शिव मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १८०० वर्षांपूर्वी शक्तिशाली हिंदू चोल राजवंशातील कोंकेगानन चोला या सुरुवातीच्या चोल राजाने बांधले आहे. सुप्रसिद्ध रंगनाथ स्वामी मंदिर असलेल्या श्रीरंगम बेटावर हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर चोल राजांच्या राजवटीत बांधले आहे. त्यामुळे अकरा-बाराव्या शतकातील शिलालेख येथे पहायला मिळतात.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

असे आहे मंदिर
सुमारे नऊ एकर जागेवर वसलेले जम्बुकेश्वर मंदिर अतिशय भव्य आहे. या मंदिराची वास्तुकला आणि शिल्पकला श्रीरंगम रंगनाथ स्वामी मंदिरापेक्षा कित्येक पट सरस आहे. खरं म्हणजे दोन्ही मंदिरांचा निर्मिती कालखंड एकच आहे. मंदिराभोवती पाच कोट किंवा प्रकार आहेत. सर्वांत बाहेरच्या दगडी कोटाचे नाव विबुदी प्राकार असून तो एक मैल लांबीचा असून २५ फूट उंच आणि २ फूट रुंद आहे. हा दगडी कोट बांधताना साक्षात भगवान शंकरानी मजुराच्या रुपांत मदत केली असे म्हणतात. त्यामुळे हा कोट अतिशय भक्कम झालेला आहे.आज १८०० वर्षानंतर देखील या कोटाला कुठे तडा गेलेला नाही की त्याचा एखादा दगड निखळलेला नाही.

या प्रकाराच्या आत २४३६ फूट लांब १४९३ फूट रुंद आणि ७९६ खांब असलेले एक भव्य सभामंडप आहे. येथे बाजूला जिवंत पाण्याचे झरे असलेला एक लहानसा तलाव आहे.त्यानंतर तिसरे कम्पाउंड ७४५ फूट लांब आणि १९७ फूट रुंद असून ३० फूट उंच आहे. या प्राकरातून प्रवेश करण्यासाठी ७३ आणि १०० फूट उंचीची दोन गोपुरं (प्रवेशद्वार)आहेत. येथे नारळाची झाडं आणि एक तलाव आहे. यानंतर ३०६ फूट लांब आणि १९७ फूट रुंदीची तटबंदी असून तिला ६५ फूट उंचीचा गोपुरम आहे.तसेच या प्रकारात अनेक लहान लहान मंदिरं आहेत. सर्वांत आतली तटबंदी १२६ फूट लांब असून १२३ फूट रुंद आहे. त्याच्या आत गाभारा असून येथे पाण्यात जम्बुकेश्वराचे शिवलिंग आहे. मंदिराचा प्रमुख गाभारा चौकोनी आकाराचा असून गाभार्याच्या छतावर विमान कोरलेले आहे.

तामिळनाडूतल्या पंचभूत स्थल दर्शन मधील पांच प्रमुख शिवमंदिरातील हे दुसरे शिवमंदिर. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंच तत्वांपासून ही पांच शिव मंदिरं बनलेली आहेत.त्यातील पाणी,जल किंवा नीर या तत्वापासून थिरुवनैकवल येथील शिवपिंडी बनलेली आहे.
जम्बुकेश्वर शिव मंदिरातील शिवलिंग केवळ जमीनीपासून खाली आहे असे नाही तर ते पाण्यातच आहे. पाण्यापासून बनलेले पाण्यातील शिवलिंग हा एक चमत्कारच आहे. येथे शिवलिंगावर वरून अभिषेक करण्याची वेळच येत नाही कारण इथलं शिवलिंग सदैव पाण्यातच असतं.

सुप्रसिद्ध आख्यायिका
या ठिकाणी शिवलिंग कसे प्रकट झाले त्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा जगाच्या कल्याणासाठी माता पर्वतीने भगवान शिवाची खोडी काढली. तेव्हा शंकरांनी तिला कैलास सोडून पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. भगवान शिवाच्या इच्छेनुसार पर्वतीने अकिलानंदेश्वरीच्या रुपांत जम्बुवनांत म्हणजेच हल्लीच्या थिरुवनैकोईल येथे जन्म घेतला. या जागेवर पर्वतीने वेन नवल नावाच्या वृक्षा खाली कावेरी किंवा पोन्नी नदीच्या पाण्यात शिवलिंग तयार करुन त्याची आराधना केली. तेव्हा पासून या शिवलिंगाला अप्पूलिंग किंवा पाण्याचे लिंग असे म्हणतात. तिची भक्ती पाहून भगवान शिव अकिलानंदेवर प्रसन्न झाले. त्यांनी तिला शिवज्ञान सांगितले. पश्चिमेकडे मुख करुन उभ्या असलेल्या शिवाकडे पूर्वेला मुख करून अकिलानंदेश्वरीने शिवाचा उपदेश ग्रहण केला तो याच ठिकाणी! या प्रसंगाची आठवण म्हणून येथे शिवलिंग प्रकटले.

शिवाला जम्बुकेश्वर नाव का पडले?
येथे शिवाला जम्बुकेश्वर हे नाव कसे पडले याविषयी एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. ‘मालयान’ आणि ‘पुष्पदंत’ नावाचे दोन शिवभक्त होते.पण ते दोघं एकमेकांशी नेहमी भांडायचे. एकदा ते असेच भांडत असतांना त्यांनी एकमेकांना शाप दिला. त्यामुळे पुष्पदंत हात्तीच्या तर मालयान मकड़ी म्हणजे कोळीच्या रुपांत पृथ्वीवर जन्माला आले. हत्ती आणि कोळी जम्बुकेश्वर येथे येऊन शिवाची पूजा करू लागले. हत्ती सोंडेने पिंडीवर पाणी टाकत असे तर कोळी शिवाला उन्हाचा व झाडांच्या पानांचा त्रास होऊ नये यासाठी शिव पिंडीवर जाळं विणीत असे. त्यांची भक्ती पाहून भगवान शंकर त्यांना जम्बुकेश्वराच्या रुपांत प्रसन्न झाले व त्यांनी त्या दोघांना शापमुक्त केले. शिवाने येथे जम्बुकेश्वराचे रूप धारण केले त्यामुळे या ठिकाणाला ‘जम्बुकेश्वर’ तर हत्तीने येथे शिवाची पूजा केली त्यामुळे या स्थानला थिरुवनैकवल असे नाव पडले.

या मंदिरात विवाह का होत नाहीत?
पंच भूत स्थलम मधल्या एकाम्बरेश्वर मंदिरांत कल्याण उत्सवाच्या वेळी हजारो तरुण तरुणीचे विवाह लावले जातात मात्र ज्म्बुकेश्वराच्या मंदिरांत विवाह लावणे निषिद्ध मानले जाते. याचे कारण असे सांगितले जाते, या मंदिरातील मूर्ती एकमेकांच्या विपरीत स्थापित केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या मंदिरांना ‘उपदेश स्थलम’ म्हणतात. या मंदिरांत देवी पार्वती शिष्येच्या रुपांत तर जम्बुकेश्वर गुरूच्या रुपांत उपस्थित आहेत. त्यामुळे या मंदिरांत थिरु कल्याणम म्हणजे विवाह लावले जात नाहीत. या मंदिरांत एकपथाथा तिरुमुथि, शिव,विष्णु आणि ब्रह्मा देखील उपस्थित आहेत .

कसे जावे:
त्रिचनापल्ली हे तामिळनाडूतील प्रसिद्ध शहर असून विमान,रेल्वे आणि बस मार्गाने सर्व मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. त्रिची किंवा त्रिचनापल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे ३ किमी अंतरावर थिरुवनैकोईल हे ठिकाण आहे. येथून जवळच श्रीरंगम हे लहानसे ऐतिहासिक शहर आहे. ही दोन्ही ठिकाणं कावेरी आणि कोलेरून नद्यांच्या बेटावर वसली आहेत.

विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
World Largest Temple Jambukeshwar Water Shivling by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री विष्णु पुराण… निमिचे चरित्र आणि वंशविस्तार…

Next Post

महिलांच्या छातीचे मोजमाप घेण्याबाबत हायकोर्ट म्हणाले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकल चोरीला

सप्टेंबर 16, 2025
IMG 20250916 WA0298 1
संमिश्र वार्ता

कांदा प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक…दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
Next Post
FVUNDa6akAAbuNR

महिलांच्या छातीचे मोजमाप घेण्याबाबत हायकोर्ट म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011