पुणे – माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज वेगवेगळे बदल होत असतात. ते इतके की, आज अनावरण झालेले एखादे उपकरण उद्या जुने होऊन जाईल. म्हणजेच तंत्रज्ञानात होणारे वेगवान बदल आश्चर्यचकित करणारे आहेत. स्मार्टफोन कंपन्यांमध्ये अशीच स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी स्मार्ट फोनमध्ये नवे फिचर्स कंपन्यांकडून सादर केले जात आहेत.
तंत्रज्ञान क्षेत्रातील ZTE ही कंपनी 18 GB क्षमतेचा जगातील पहिल्या स्मार्टफोनचे अनावरण करणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या Axon 30 Ultra या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा नवा स्पेस एडिशन व्हेरिएंट आहे. चीनमध्ये २५ नोव्हेंबरला अनावरण होणार्या या फोनला कंपनीने नुकतेच टिझ केले आहे. या मर्यादित एडिशन व्हेरिएंटमध्ये कंपनीकडून १ टीबी इंटरनल स्टोअरेज दिला जाणार आहे. तसेच या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचे तीन कॅमेरे मिळणार आहेत.
फोनमध्ये आहेत हे फिचर्स
या फोनमध्ये बर्याच अंशी ओरिजनल Axon 30 Ultra चे फिचर पाहायला मिळू शकतात.
फोनमध्ये १०८०×२४०० पिक्सल रेझॉल्युशनसह ६..६७ इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. HDR10+ सपोर्टसह मिळणार्या या डिस्प्लेला २०ः९ चा आस्पेक्ट रेशो आणि १४४ एचझेड इतका रिफ्रेश रेट आहे. हा फोन १८ जीबीपर्यंत LPDDR5 RAM आणि १ टीबी UFS 3.1 स्टोअरेजसह मिळतो.
या फोनमध्ये प्रोसेसरच्या रूपात स्पेस एडिशनमध्ये कंपनीकडून स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट देण्यात येणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रिअर कॅमेरे मिळणार आहेत. त्यामध्ये ६४ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेर्यासह एक ६४ मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स आणि एक अल्ट्रा-व्हाइड अँगलचा ६४ मेगापिक्सल ५× ऑप्टिकल झूम सपोर्ट करणारा ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनीकडून १६ मेगापिक्सलचा कॅमेरा ऑफर करण्यात येणार आहे.
फोनला ऊर्जा देण्यासाठी कंपनी ४६०० एमएएच ची बॅटरी ऑफर करणार आहे. ही बॅटरी ६६ वॉटची असून वेगाने चार्ज अनुभव देणार आहे. ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल सांगायचे झाल्यास हा फोन अँड्रॉइड ११ वर आधारित MyOS11 सोबत मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ५ जीबी, एनएफसी, वाय-फाय ६ई, ब्लूटूथ ५.२, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा पर्याय मिळणार आहे. फोनची किंमत आणि उपलब्धतेबाबत २५ नोव्हेंबरला माहिती दिली जाणार आहे.