मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ओटीटीवर रंगणार ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’

by Gautam Sancheti
मे 5, 2023 | 5:09 am
in मनोरंजन
0
Athiran Poster 2

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी ‘थरार प्रेमाचा- अथिरन’ डिजिटल प्रीमियरची घोषणा करत आहेत. ८ मेपासून या अल्ट्रा झकासवर या चित्रपटाचा थरार रंगणार आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बहुचर्चित ठरलेल्या ‘अथिरन’ या मल्याळम भाषेतील चित्रपटाचा मराठीत डब केलेला ‘थरार प्रेमाचा- अथिरन’ हा चित्रपट एक्स्क्लुझिवली अल्ट्रा झकास ओटीटी अॅपवर पाहता येणार आहे. पुष्पाफेम अभिनेता फहाद फासिल, अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच दाक्षिणात्य दिग्दर्शक विवेक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे. भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

“कलाकारांची उत्तम फळी लाभलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाची रहस्यांनी आणि थराराने परिपूर्ण कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेले. दाक्षिणात्य सिनेविश्वात बहुचर्चित असणारा हा चित्रपट आम्ही मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट व अल्ट्रा झकासचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. ५९ रुपयांत मासिक, १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या.

शूssss…?इकडे माणूस येतो, पण परत कोणी जात नाही. ? #TrailerOutNow
'थरार प्रेमाचा-अथिरन' ८ मे पासून फक्त #UltraJhakaas ओटीटी प्लॅटफॉर्मवर !
आत्ताच डाऊनलोड करा – https://t.co/i5iJXjSRjG @Sai_Pallavi92 #FahadhFaasil @atul_kulkarni @JoinPrakashRaj @vivekagnihotri pic.twitter.com/NlYcOYEy3O

— Ultra Jhakaas (@ultrajhakaas) May 2, 2023

World Digital Premier Tharar Ptemacha OTT

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी घेतला या लोकसभा मतदारसंघांचा आढावा

Next Post

रामायण यात्रा दर्शन (भाग- १५)… हाच आहे शबरीचा खरा आश्रम… अशी आहे या स्थानाची महती…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
EyQ V7HUcAI8uPX

रामायण यात्रा दर्शन (भाग- १५)... हाच आहे शबरीचा खरा आश्रम... अशी आहे या स्थानाची महती...

ताज्या बातम्या

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला हा स्पष्ट आदेश….

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
IMG 20250708 WA0417 1

एमएमसीअंतर्गत होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्‍या नोंदणीला विरोध…आयएमए नाशिकतर्फे जिल्‍हाधिकार्यांना निवेदन

जुलै 8, 2025
solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011