इंडिया दर्पण विशेष लेख
जागतिक बुद्धीबळ स्पर्धा
बुद्धिबळ जगज्जेतेपदाची स्पर्धा आता निर्णायक टप्यावर!
अस्ताना (कझाकस्तान) येथे रशियाचा आयन नेपिम्नियाची आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यात नऊ एप्रिल पासून चालू असलेल्या बुद्धिबळ विश्वविजेते पदाची तुल्यबळ आणि चुरशीची लढत ११ व्या डावा नंतर आता अत्यंत निर्णायक अशा टप्प्यावर येउन ठेपली आहे !
मंगळवारच्या ( आजच्या ) विश्रांतीच्या दिवशी नेपो ६-५ असा अवघ्या एका गुणाने आघाडीवर आहे. लिरेन ने सहावा डाव जिंकून बरोबरी साधली होती पण नेपोने सातवा डाव जिंकून एक गुणाची जी आघाडी घेतली ती ८ ते ११ असे चारही डाव बरोबरीत सुटल्याने कायम आहे.
हे चारही डाव जरी बरोबरित सुटले असले कंटाळवाणे न होता अतिशय चुरशीचे आणि शेवटपर्यंत रंजक झाले असे सर्व जाणकारांचे मत आहे ! त्यामुळेच नेपो जरी एका गुणाने पुढे असला तरीही डिंग लिरेन खचून गेलेला नाही कारण अजून तीन डाव शिल्लक आहेत आणि मह्त्वाचे म्हणजे त्यातील दोन डावात लिरेन पांढरे मोहोरे घेउन खेळणार आहे !
लिरेन चा अनुभव आणि इतिहास असा आहे की तो शेवट जवळ आला की अधिक चांगला खेळतो.
जगज्जेतेपदाचा आव्हानवीर निश्चित करण्यासाठी झालेल्या कॅंडिडेट स्पर्धेत सुरवातीला खूप मागे पडूनही लिरेनने उत्तरार्धात जबरदस्त खेळून उपविजेतेपद मिळविले होते आणि त्यामुळेच तो ही लढत खेळत आहे हा इतिहास अगदी ताजा आहे !
या शिवाय चीन च्या खेळाडूमध्ये जबरदस्त Fighting Spirit असते त्याचे आता प्रत्यंतर येत आहे ! पण रशियन खेळाडूही कच्चे चेले नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे.
नेपोचा सहाय्यक (Second) हा बहुधा माजी जगज्जेता रशियाचाच क्रामनिक असावा असा ग्रॅंडमास्टर प्रवीण ठिपसे आणि अनेक माजी खेळाडूचा संशय आहे कारण नेपो जे डाव थोडा अधिक प्रयत्न केल्यास जिंकता येतील तेही बरोबरित सोडवीत आह. याचे कारण असे की थोडा धोका पत्करून खेळल्यास एखादेवेळी पराभव होऊ शकतो अशा वेळी हरण्या पेक्षा बरोबरी चांगली ही रीत क्रामनिक वापरत असे ! तीच पध्दत नेपो अमलात आणीत आहे !
जाता जाता लिरेन चा सहाय्यक ग्रॅंडमास्टर रिचर्ड रॅपोर्ट आहे हे आधीच जाहीर झाले आहे (आपला सहाय्यक समजू न देण्याची पद्धत बुद्धिबळ खेळाडूत विशेषत: खूप मह्त्वाच्या लढतीत आहे हे येथे नमूद केले पाहिजे). आता १२ वा आणि १३ वा डाव गुरुवारी आणि शुक्रवारी खेळले जातील आणि १४ वा आणि अंतिम डाव रविवारी खेळविला जाईल त्यात ज्या खेळाडूचे साढे सात गुण होतील तो विजेता होईल . तथापि बरोबरी झाल्यास रॅपिड डाव , त्यातही बरोबरी झाल्यास ब्लिट्झ डाव आणि त्यातही बरोबरी झाल्यास Sudden Death पध्दतीने निकाल लावला जाईल !
deepakodhekar@gmail.com
World Chess Championship Ian Nepomniachtchi Ding Liren