इंडिया दर्पण विशेष लेख
जागतिक बुद्धीबळ स्पर्धा
कोण होणार जगज्जेता आज फैसला
एकूण १४ डावांची कझाकस्तान येथील अस्ताना येथे चालू असलेल्या रशियाच्या आयन नेपोम्नियाची आणि चीन चा डिंग लिरेन यांच्यातील बुद्धिबळ जगज्जेतेपदाची लढाई १३ व्या डावा नंतर ६:५ /६:५ अशा अत्यंत रोमहर्षक टप्प्यावर येउन ठेपली आहे आणि आता फक्त एकच डाव – जो शनिवारी – खेळविला जाणार आहे – शिल्लक असल्याने कोण विश्व विजेता होणार याची अवघ्या जगातील बुद्धिबळ प्रेमीं मध्ये प्रचंड उत्कंठा आणि उत्सुकता लागलेली आहे !
आतापर्यंत झालेल्या १३ लढतीत नेपो आणि लिरेन यांनी आतिशय उच्च दर्जाचा खेळ दाखवला असला तरीही त्यांनी असंख्य चुकाही केल्या आहेत आणि त्या मान्यही केल्या आहेत ! म्हणूनच सर्व डाव अतिशय चुरशीचे झाले आहेत ! शेवटचा १४ डाव कोण जिंकणार याचा आता बिलकुल अंदाज करता येत नाही इतके दोघे तुल्यबळ खेळ खेळत आहेत !
चीन चा लिरेन या अंतिम डावात पांढऱ्या मोहरा घेउन खेळणार आहे म्हणून बुद्धिबळ परंपरेनुसार त्याचे पारडे जरासे जड आहे पण नेपो कच्च्या गुरुचा चेला नाही त्यामुळे दोघेही अति सावध खेळून सहज जिंकता येत असेल तरच विजयाचा प्रयत्न करतील अन्यथा डाव अनिर्णित ठेवून टाय ब्रेकर म्हणून रॅपिड आणि ब्लिट्झ ( म्हणजे जलद आणि अति जलद ) लढती खेळतील असा जास्तीतजास्त जाणकारांचा अंदाज आहे !
२००६ साली विश्वनाथ आनंद रशियाचा तोपोलोव यांच्यात १४ वा अंतिम डाव असाच रंगला होता त्यात तोपोलोव पांढऱ्या मोहरा घेऊन खेळूनही हरला होता हे सांगण्याचे कारण लिरेन ने आपला विजय गृहीत धरु नये असे अनेक माजी खेळाडू म्हणतात ! एकंदरीत शनिवारी रात्री चित्र स्पष्ट होईल तो पर्यंत Keep the fingers crossed !
दीपक ओढेकर
deepakodhekar@gmail.com
World Chess Championship Final Result Today