इंडिया दर्पण विशेष लेख
बुद्धिबळ जगज्जेता कोण होणार?
नेपो की लिरेन?
उद्यापासून म्हणजेच ९ एप्रिलपासून कझाकस्तान येथील अस्ताना येथे बुद्धिबळ विश्व विजेतेपदासाठी १४ डावांची लढत सुरु होत आहे. एक मे पर्यंत चालणाऱ्या या तुल्यबळ लढतीकडे साऱ्या जगातील बुद्धिबळ चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. ही लढत अतिशय लक्षणीय राहणार आहे.
कारण २०१३ पासून दर दोन वर्षांनी होणारी ही लढत मॅग्नस कार्लसन इतक्या लिलया आणि आक्रमकपणे जिंकत होता की त्याला आजही हरविणे , विशेषतः विश्वचषक स्पर्धेत जवळ जवळ अशक्य आहे! बुद्धिबळ नियमांनुसार आधीच्या विश्व विजेत्याला आव्हान देण्यासाठी दोन वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू म्हणजेच जगातील अव्वल आठ खेळाडूत झालेल्या Candidates’ स्पर्धेतील विजेता हाच आव्हानवीर म्हणून प्रतिस्पर्धी या नात्याने जगज्जेतेपदासाठी या लढतीत झुंज देतो.
तथापि कार्लसनने पाचवेळा जगज्जेतेपद हासिल केल्यावर आता त्याच त्याच खेळाडबरोबर पुन्हा खेळण्याची आता इच्छा राहिली नाही आणि पुन्हा ( एकदा ) जगज्जेता होणात आता रस राहिला नाही असे जाहीर केले. तो असेही म्हणाला की मला जगज्जेतेपदासाठी इराणमध्ये जन्मलेला फ्रेंच खेळाडू अलिरझा फिरौझा सारख्या अतिशय गुणी तरुण खेळाडूबरोबर खेळायला आवडेल. तथापि फिरौझा काही Candidates’ स्पर्धा जिंकला नाही. त्यामुळे अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही आणि कार्लसन त्याच्या विश्वविजेतेपदाची लढत न खेळण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळे आता Candidates’ विजेता रशियाचा आयन नेपोम्नियाची उर्फ नेपो आणि उपविजेता चीनचा डिंग लिरेन या दोघांत लढत होत आहे ! फिडे ( विश्व बुद्धिबळ संघटना ) रेटिंगमध्येही हे दोघे कार्लसनच्या खालोखाल क्रमांक दोन ( नेपो – २७९५ गुए ) आणि तीन (लिरेन – २७८८ ) वर आहेत ..
कार्लसन अर्थातच खूपच पुढे म्हणजे मार्चअखेर २८६५ गुण घेउन २००७ पासून पहिल्या क्रमांकावर आहे !
जो खेळाडू प्रथम ७:५ गुण मिळवेल तो जगज्जेता होइल आणि त्याला दोन लाख युरो या बक्षीस रकमेच्या ६० टक्के बक्षीसरुपाने मिळतील तर उरलेले ४०;टक्के उपविजेत्याच्या खात्यात जमा होतील ! जर लढत टायब्रेक मध्ये गेली तर Rapid tie breaker होऊन हीच रक्कम ५५% आणि ४५ % अशी वाटली जाईल. जगातील १७ वा विश्वविजेता निश्चित करण्यासाठी होणाऱ्या या लढाईच्या पहिल्या चार लढतीचे समालोचन;माजी पाच वेळी विश्वविजेतेपद जिंकणारा विश्वनाथ आनंद करणार आहे तर राहिलेल्या इतर लढती ग्रॅंडमास्टर दुबोव हा रशियन खेळाडू कऱंणार आहे.
कार्लसनने जसे खेळण्यास नकार दीला तसाच नकार अमेरिकेच्या बॉबी फिशरने फिडेचे काही नियम न रूचल्याने १९७५ साली दीला होत्या . त्यामुळे त्यावर्षी स्पर्धा न होत्ता आव्हानवीर अनातोली कॉरपॉव ला जगज्जेतेपद बहाल केले गेले. साऱ्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या अशा लढतीत खेळाडूचा सपोर्ट स्टाफ किंवा बुद्धिबळ खेळाच्या भाषेत Seconds हे फार मह्त्वाचे असतात आणि त्यामुळे त्यांची नावे कधीही जाहीर केली जात नाहीत . Seconds हे जागतिक दर्जाचे फार महान खेळाडू असतात . या स्पर्धेतील नेपो हा कार्लसनचा २०१३ च्या जगज्जेतेपदाच्या भारताच्या आनंद विरूध्द झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढाईत second होता तर आता समालोचकाच्या भूमिकेतील दुबोव हा कार्लसनच्या २०२० च्या लढतीत त्याचा second होता.
स्पर्धेतील दोन्ही खेळाडूच्या देशातील बुद्धिबळ शौकीनाना स्पर्धा बघता यावी म्हणून त्यांच्या सोयीच्या वेळे साठी कझाकस्तान येथे स्पर्धा होत आहे . खरं तर इतर अनेक देशानी या लढतीचे यजमानपद मागितले होते ! अशा रितीने १ मे रोजी जगाला बुद्धिबळ स्पर्धेतील कार्लसन नव्हे तर नवा विश्वविजेता पहायला मिळणार आहे ! तो पर्यंत अतिशय चुरशीची आणि क्षणोक्षणी रंगतदार होणाऱ्या या लढतीचा आनंद लुटू या!
– दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
deepakodhekar@gmail.com