इंडिया दर्पण विशेष लेख
विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धा
चौथा डाव जिंकून डिंग लिरेनची नेपोशी बरोबरी
कझाकस्तान येथील अस्ताना शहरात नऊ एप्रिल पासून १४ डावाची जगतज्जेतेपदाची लढत आज चौथ्या डावा नंतर एकदम रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. दिवसागणिक उत्कंठा वाढत आहे. त्यामुळे जगज्जेता कोण होणार याकडे संपूर्ण जगाचेच लक्ष लागले आहे.
पहिले दोन डाव अतिशय मानसिक दबावाखाली खेळणाऱ्या आणि दुसरा डाव अगदी वाईटरित्या हरणारा चीनचा डिंग लिरेन आणि रशियाचा आयन नेपोम्नियाची ही लढत पूर्ण १४ डाव संपण्याच्या आधीच संपेल असे भाकीत समालोचक विश्वनाथ आनंद , ग्रॅन्डमास्टर अनिश गिरी आणि प्रवीण ठिपसे तसेच माजी महिला विश्वविजेत्या जुदिथ पोलगर इत्यादि खेळाडूनी वर्तविले होते. पण एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ताजा तवाना झालेल्या लिरेन ने चीनचा सुप्रसिद्ध लढाऊबाणा दाखवून तिसरा डाव ६८ चाली खेळून बरोबरीत सोडविला तोही डावावर वर्चस्व राखून. या खेळीमुळे लिरेन चा आत्मविश्वास इतका वाढला की त्याने डाव संपल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये अतिशय मनमोकळेपणे उत्तरे दिली.
या नव्या सकारात्मक बदल झालेल्या लिरेन ने मग आज ४ था डाव पांढऱ्या मोहोरा घेउन खेळताना अवघ्या ४७ चालीत जिंकला आणि नेपोशी २-२ अशी बरोबरी केली !
२७ व्या चालीपर्यंत बरोबरीने चाललेल्या या डावात नेपोने २८ व्या मोठी चूक केली आणि लिरेन ने संधी साधली. त्याने तसे सामना संपल्यावर तसे जाहीरही केले .
नेपो एकदम दबावाखाली ४८ व्या चालीनंतर पराभूत झाला.
आपले शेवटचे चौथे समालोचन करीत असलेल्या आनंदने २८ व्या चालीत नेपो ने केलेल्या चुकीच्या खेळीनंतर जाहीर केले की ही लढत आता ८०% लिरेन च्या बाजूने झुकलेली आहे तर अनिश गिरी म्हणाला की आता लिरेन ला हरविणे नेपोला अतिशय कठीण जाणार आहे !
जगज्जेतेपदाची पात्रताफेरी असलेल्या Candidates या जगातील अव्वल आठ खेळाडूच्या लढतीतही लिरेन सुरवातीला खूप मागे होता पण त्याच्या लढाऊ वृत्तीने तो उपविजेता झाला होता ! उद्याच्या विश्रांतीनंतर पाचवा डाव शनिवारी खेळविण्यात येइल !
दीपक ओढेकर
लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
deepakodhekar@gmail.com
World chess championship 2023 Ian Nepomniachtchi Ding Liren