इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात प्रदूषण ही मोठी समस्या आहे. आता एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत आठव्या क्रमांकावर आहे. भारतीय शहरांमध्ये सरासरी प्रदुषित कणांचे प्रमाण 2.5, 53.3 मायक्रोग्राम असल्याचे आढळले आहे. जे जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेच्या 10 पट आहे. स्विस फर्म ‘IQ Air’ ने ‘जागतिक वायू गुणवत्ता’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील १३१ देशांच्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार, जगातील सर्वात प्रदूषित देश चाड आहे. जेथे PM 2.5 स्तरावर सरासरी वायू प्रदूषण 89.7 असल्याचे आढळून आले आहे. इराक हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आणि बहरीनचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे.
वायू प्रदूषणामुळे भारताला 150 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतातील वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा घटक म्हणजे वाहतूक क्षेत्र आहे. जे एकूण प्रदूषणाच्या 20-35 टक्के प्रदूषण करते. प्रदूषणासाठी वाहतूक घटकाव्यतिरिक्त उद्योग, कोळशावर चालणारे वीज प्रकल्प जबाबदार आहेत.
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारताला मोठा धक्का बसला आहे. टॉप 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 65 शहरे भारतातील आहेत. त्याच वेळी, टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी सहा भारतीय आहेत. पाकिस्तानचे लाहोर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. लाहोरमध्ये पीएम 2.5 ची पातळी 97.4 मोजली गेली आहे. चीनचे होतन शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे, जेथे पीएम 2.5 पातळी 94.3 आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारतातील भिवंडी आणि राजधानी दिल्लीचे नाव आहे. दिल्लीत पीएम २.५ ची पातळी ९२.६ इतकी मोजली गेली आहे. टॉप 10 मधील इतर भारतीय शहरांमध्ये बिहारमधील दरभंगा, आसोपूर, पाटणा, नवी दिल्ली यांचा समावेश आहे.
World Air Quality Report Indian Cities Pollution Ranking