विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोना महामारीमध्ये घरातील जबाबदाऱ्या सांभाळून महिलांना ऑफिसचे काम करावे लागत आहे. सहाजिकच दोन्ही कामांचा भार वाढल्यामुळे शारिरीक व मानसिक ताण वाढला आहे. नोकरी करण्याचे समाधान मिळत नसल्याने भारतातील २६ टक्के काम करणाऱ्या महिला आपली नोकरी सोडण्याचा विचार करत असल्याची बाब समोर आली आहे.
एका आंतराष्ट्रीय कंपनीने नोकरी करणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, सध्या जवळपास ५१ टक्के महिला आपल्या करिअरबद्दल कमी आशावादी आढळल्या. डेलॉयट कंपनीतर्फे १० देशांच्या ५ हजार महिलांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये ५०० भारतीय महिलांचा समावेश आहे.










