इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या खात्यात अतिरिक्त ५०० रुपये दिसले तरीही हे पैसे आले कुठून यासाठी शंभर वेळा बॅलन्स चेक करणारा कामगार त्याच्या खात्यात अचानक २०० कोटी रुपये आले तर काय करेल? गंमत वाटत असली तरीही असे घडले आहे आणि त्याची देशभर चर्चाही होत आहे.
अशा घटनांसाठी देशातील कुठलेही राज्य वर्ज्य नाही. कोणत्याही ठिकाणी असे घडू शकते. बरेचदा बँकेकडून चुका होतात आणि भलत्याच ग्राहकाच्या खात्यात लाखो रुपये चालले जातात. मग ते पैसे होल्डवर ठेवून संबंधित ग्राहकाला त्याची माहिती दिली जाते. खात्यात जमा झालेले पैसे तुझे नाहीत, ते बँकेचे आहेत, असे कळविले जाते. त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते. एखाद दुसरा अपवाद वगळता बहुतांश प्रकरणात ग्राहकाला त्याची जाण असते त्यामुळे ते पैसे वापरले जात नाहीत. पण या सर्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालेल्या चुका समजल्या जातात. मात्र काही वेळा विशिष्ट्य उद्देशाने एखाद्याच्या खात्यात पैसे टाकले जातात. पण ही रक्कम लाखाच्या वर नसते.
मात्र हरियाणातील एका छोट्या गावात राहणाऱ्या कामगाराच्या खात्यात २०० कोटी रुपये आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. हरियाणातील चरखी दादरी येथील बेरला या गावात राहणारा विक्रम हा कामगार असून तो कामाच्या निमित्ताने गावाच्या बाहेर आहे. त्याच्या घरी भाऊ प्रदीप आणि आई राहतात. एकतर आवश्यक कागदपत्र जमा करू शकला नाही म्हणून विक्रमचे बँकेत खाते उघडता आले नाही आणि त्यामुळे त्याला कंपनीने नोकरीवरूनही काढून टाकले. दुसरीकडे त्याच्या येस बँकेतील खात्यात २०० कोटी रुपये आल्याने सगळेच बुचकाळ्यात पडले.
थेट पोलीसच आले घरी
विक्रमच्या खात्यात २०० कोटी रुपये आल्यानंतर बँकेने खाते तर होल्डवर टाकले. पण पहिले पोलिसांना माहिती दिली. पोलीस थेट विक्रमच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली तर त्याच्या भावाला काहीच कळत नव्हते. शेवटी पोलिसांनी त्याला ठाण्यात चलायला सांगितले. मात्र शेजाऱ्यांनी विरोध केल्यामुळे तिथेच चौकशी करण्यात आली. या पैशांबद्दल कुणालाही काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
Worker Bank Account Deposit 200 Crore Suddenly