नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी महिला कर्मचारी आणि परिचारिकांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करत शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यावेळी त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. आम्हाला संरक्षण मिळालेच पाहिजे, हमारी युनिअन हमारी ताकत, ‘हम सब एक है,’ ‘आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
‘आम्हाला संरक्षण मिळालेच पाहिजे,’ ‘हमारी युनिअन हमारी ताकत’, ‘हम सब एक है,’ ‘आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत यावेळी कर्मचाऱ्यांनी न्यायाची मागणी केली आहे. दिवसरात्र परिचारिका रुग्णांची सेवा करतात, २४ तास त्या सेवा देतात, कर्मचारी साफसफाई करत असतात, मात्र त्यांची सेवा कोण करणार असा सवाल यावेळी करण्यात आला. तसेच परिचारिका आणि कर्मचारी महिलेला जोरदार मारहाण करण्यात आली. त्यामुळे संरक्षणाची तीव्र मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. तसेच न्याय आणि संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आता आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. ठोस आश्वासन मिळेपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राही’, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.
नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग
साफसफाई करण्यासाठी परिचारिका व महिला कर्मचाऱ्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र त्याचा राग आल्याने नातेवाईकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि एका नर्सच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. तसेच मिटवण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यास जमिनीवर पडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. या घटनेमुळे परिचारिका तसेच कामगार संतप्त झाले आहे आणि त्यांनी आंदोलन पुकारले आहे.