पुणे – कोरोना काळात लॉकडॉऊन असल्याने अनेकांना वर्क फॉम होम करावे लागले. त्यामुळे संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल वरून काम करताना तासन्तास बसावे लागते. सहाजिकच अनेकांना पाठ दुखीचा त्रास होत आहे. पाटदुखीचा त्रास वाढल्याने पाठीचा आकार बिघडतो, त्यामुळे त्यांचा एकूणच आपल्या लुक किंवा व्यक्तीमत्यावर देखील विपरीत प्रभाव पडतो. अशा प्रकारच्या समस्या असलेल्या लोकांचा कामाचा स्टॅमिना देखील कमी होऊ लागतो. त्याकरिता काही व्यायाम किंवा आसन हा पाठ दुखी टाळण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्याबद्दल जाणून घेऊ या …
बाळ स्थिती व्यायाम
हा व्यायाम दररोज केल्याने आपल्या पाठीचे स्नायू मजबूत होतात. संगणकावर सतत काम केल्याने तुमच्या पाठीचा आकार बिघडला असेल तर कामातून थोडा वेळ काढून ही सोपी पोज करू शकता. यामुळे आपला पाठीचा कणा मजबूत होईल. तसेच त्याचे इतर अनेक फायदे आहेत.
हा व्यायाम कसा करावा?
– सर्वप्रथम जमिनीवर बसा.
– आता आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.
– यानंतर, दोन्ही गुडघे नितंबांपासून किंचित पसरवा.
– आता आपली बोटे वाकवून जमिनीला स्पर्श करा.
– यानंतर, गुडघे वाकवा आणि नितंब थोडे मागे घ्या.
– या स्थितीत आल्यानंतर आपले दोन्ही हात घट्टपणे पुढे करा.
– मग डोके खाली हलवा. मात्र असे करताना डोक्यावर कोणताही दबाव येणार नाही याची विशेष काळजी घ्या.
– आता दोन्ही तळवे जमिनीवर ठेवा.
– सुमारे 15 ते 20 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर जुन्या स्थितीकडे परत या.
– हा प्रकार 3 ते 4 वेळा पुन्हा करा.
या व्यायामाचे फायदे
– शरीराची ऊर्जा वाढते आणि ते लवचिक बनते.
– तणाव, अस्वस्थता दूर होऊनणि मन शांत होते.
– पोटाच्या संबंधित रोग बरे करण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी व्यायाम किंवा आसन आहे.
– मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.
– नितंब (हिप ) जांघ आणि ओटीपोटाची चरबी कमी होते.
– खांदा, मान आणि हात दुखण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
– फुफ्फुसांची क्षमता वाढवते.
– पाठीच्या दोन्ही बाजूचे हाड कडक झाले असेल तर हे आसन केल्याने ते लवचिक होते.