इंडिया दर्पण विशेष
– शंका समाधान –
प्रश्न – असंख्य वाचकांनी एक प्रश्न प्रकर्षाने विचारला आहे तो म्हणजे, कोणतेही काम करत असताना अडचणी खूप येतात. त्यासाठी काही खास उपाय आहेत का
उत्तर – कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना आपण आपल्या शुभ वार व शुभ दिनांक याची निवड केली तर आपल्याला निश्चित यश प्राप्ती मिळते. कोर्टाची कामे असतील तर शुभ काळामध्ये घरातून बाहेर पडावे. ज्या दिवशी काम आहे त्या वाराच्या देवतेची प्रार्थना करावी. निश्चित लाभ होतो.
नवीन वस्तू नवीन कपडे घ्यायचे असल्यास बुधवार व शुक्रवार या वारांची निवड केल्यास आपल्याला घेतलेल्या वस्तूंचे पॉझिटिव्ह इफेक्ट पाहायला मिळतात. शनिवारच्या दिवशी शक्यतो लोखंडाची वस्तू घरात आणू नये. त्याचप्रमाणे तेल, मीठ व केरसुणी सुद्धा विकत घेऊ नये. शनिवारी गाडीमध्ये पेट्रोल भरणे टाळावे.
वरील गोष्टींचा अनुभव घ्या व आम्हाला आपला अनुभव नक्की शेअर करा…