मुंबई – दिवाळीचा सण आटोपल्यानंतर तुम्ही गावी असाल किंवा गावाहून नुकतेच घरी परत असाल.. त्यातही आज जर तुम्हाला केवळ टाईमपास करायचा असेल तर तुमच्यासाठी एक नामी संधी आहे. ती म्हणजे तब्बल ४ तासांच्या मनोरंजनाची. टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत केव्हाच बाहेर पडला आहे. आणि आज भारताचा सामना नामिबियाच्या संघाशी होत आहे. हा सामना म्हणजे केवळ औपचारिकता आहे. ना नामिबियाला काही फायदा आहे, ना भारताला. कुणीही हरले आणि कुणीही जिंकले तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही. कारण, उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. त्यातील चारही संघ ठरले आहेत. त्यामुळे आजचा सामना केवळ टाईमपास आहे. नामिबियाने विश्वचषकातील एकही सामना जिंकलेली नाही. त्यामुळे तो पुन्हा हरणार की भारताला पराभूत करणार याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. निखळ टाईमपास म्हणून आपण सामना बघा. आज सायंकाळी साडेसात वाजता हा सामना दुबईत होत आहे.