नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक पेन्शन योजना आणल्या आहेत, विशेषतः महिलांसाठी या योजना फायदेशीर असून बँकेमार्फत या पेन्शन योजना राबविल्या जातात. यामध्ये महिलांना वयाच्या साठ वर्षानंतर त्याचा फायदा मिळू शकतो. त्यासाठी त्याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
आपल्याला जर चांगला नफा मिळवायचा असेल किंवा तुमच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक करायची असेल. तर या योजनेमध्ये तुम्हाला जास्त जोखीम नाही याउलट जास्त नफा आहे, तर नेशन पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. या योजनेमुळे तुम्हाला दर महिन्याला चांगली रक्कम मिळू शकते. आम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण तपशील आणि तुम्हाला दरमहा सुमारे ४५ हजारांची रक्कम कशी मिळेल ते जाणून घेऊ या.
1) राष्ट्रीय पेन्शन योजना : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही स्वैच्छिक सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जी लोकांना मोठा दिलासा देते. लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना आणली आहे. या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत. जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर खाते उघडायचे असेल तर या योजनेत तुम्ही कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिस उघडू शकता.
2) एकरकमी रक्कम : एनपीएस खाते तुमच्या पत्नीला ६० वर्षांचे झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच त्यांना दरमहा पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्नही मिळेल. यासोबतच त्यात दर महिन्याला पैसेही मिळतात. मात्र या योजनेत ६० वर्षांनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
3) गुंतवणूक कशी करू शकता: सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक एनपीएस खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त १ हजार रुपयांमध्ये खाते उघडू शकता. या योजनेत, एनपीएस खाते वयाच्या ६० व्या वर्षी परिपक्व होते. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजना आणखी पाच वर्षे चालवू शकता.