शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आली भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर! चार्जिंगचे टेन्शन नाही; अवघ्या ४९९ रुपयात करा बुक

नोव्हेंबर 23, 2021 | 10:42 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FEx7TRaXIAIr84X

मुंबई – पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढल्याने सध्याच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे, त्यातच नुकत्याच झालेल्या दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटरने बाजी मारली आहे. त्यामुळे भारतीय वाहन बाजार इलेक्ट्रिक स्कूटर दिशेने वेगाने वाढ होत आहे. ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे, विशेषत: दुचाकी वाहनांकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात आणत आहे.

आपण स्वतःसाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस म्हणजे एक आठवडाभर थांबा. कारण देशातील प्रसिद्ध बाउन्स ही कंपनी आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘बाउन्स इन्फिनिटी ‘ (Bounce Infinity) दि. २ डिसेंबर रोजी लॉन्च करणार आहे. आपण केवळ ४९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता. या स्कूटरचे प्री-बुकिंग लॉन्च झाल्यानंतरच सुरू होईल.

चार्जिंगचे नो टेन्शन
सदर ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर असून प्रगत उपकरणांसोबतच इंटेलिजेंट फीचर्सही देण्यात आले आहेत. या स्कूटरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या रायडर्सना बॅटरी रेंज आणि चार्जिंगची काळजी करण्याची गरज नाही. कारण बॅटरी स्वॅपिंग सेंटर्समधून चार्ज केलेल्या बॅटरीची देवाणघेवाण करण्यात येईल. यामुळे ग्राहकांना रेंज तसेच इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगची चिंता करावी लागणार नाही.

अशी आहे स्वॅप योजना
स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बॅटरी आणि रेंज चार्जिंगची चिंता करावी लागू नये यासाठी कंपनी एक खास स्कीम ऑफर करणार आहे. ‘बॅटरी अॅज अ सर्विस’ असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये ग्राहकांना स्कूटर खरेदी करताना बॅटरीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. बाउन्स इन्फिनिटी स्कूटर खरेदी करणारे ग्राहक बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर सदर बॅटरी स्वॅपिंग सेंटर्समधून चार्ज केलेल्या बॅटरीची देवाणघेवाण करू शकतील. यामुळे ग्राहकांना रेंज तसेच इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगची चिंता करावी लागणार नाही.

सुमारे ५० टक्के बचत
या योजनेअंतर्गत स्कूटरच्या किमतीत सुमारे ५० टक्के कपातही केली जाणार आहे. स्कूटर चालकांना बॅटरी स्वॅप केल्यानंतरच पैसे द्यावे लागतील. कमी किमतीमुळे ‘ बाऊन्स इन्फिनिटी ‘ ही स्कूटर अधिकाधिक नागरिकांना उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना बॅटरी स्वॅपिंग स्टेशन शोधण्याची चिंता करावी लागणार नाही. याची खात्री करण्यासाठी कंपनी आपल्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा विस्तार करत आहे. सध्या, कंपनीकडे १७० हून अधिक ठिकाणी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आहेत. येत्या काही वर्षांत यात आणखी वाढ होणार आहे. आतापर्यंत, कंपनीच्या EV श्रेणीने २० दशलक्ष किलोमीटर व्यापले आहे. ५ लाखांहून अधिक बॅटरी स्वॅप यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

एरोडायनामिक डिझाइन, उत्कृष्ट शो
बाउन्स इन्फिनिटीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डिझाइन खूप एरोडायनामिक (वायुगतिकीय ) ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये राउंड हेडलॅम्प, रेट्रो-स्टाईल फ्रंट फेंडर, एलसीडी इंस्ट्रुमेंटेड कन्सोल, सिंगल पीस सीट, स्पोर्टी अलॉय व्हील, मजबूत ग्रॅब रेल आणि स्लीक टेल लॅम्प देत आहे. ही ई-स्कूटर सिंगल-टोन कलर व्हेरियंटमध्ये सादर केली जाऊ शकते. कंपनी स्कूटरमध्ये हब-माउंटेड मोटर देणार आहे. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला ड्युअल सस्पेन्शन आहे. तसेच या स्कूटरला पुढे आणि मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यशवंतराव चव्हाण संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय चोरमारे; फलटणमध्ये गुरुवारी संमेलन

Next Post

अंगारकीला बाप्पा पावला! उघडले सिद्धीविनायकाचे मंदिर (घ्या Live दर्शन)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
siddhivinayak temple e1650340462446

अंगारकीला बाप्पा पावला! उघडले सिद्धीविनायकाचे मंदिर (घ्या Live दर्शन)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011