इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वुमन्स प्रीमीयर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत दुस-यांचा चॅम्पियन ठरला आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या पर्वातही दिल्लीने पराभवाची हॅट्रीक केली आहे. तिसऱ्यांदा जेतेपदाचं दिल्लीच्या संघाचं स्वप्न भंगलं आहे.
या स्पर्धेत प्रथम गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला १४९ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी १५० धावांचं आव्हान होते. पण दिल्ली कॅपिटल्सने झटपट विकेट गमवल्या आणि या संघाचा अंतिम सामन्यात सलग तिसऱ्यांदा पराभव झाला. तीन वर्षात थेट अंतिम फेरी गाठणारा दिल्ली हा एकमेव संघ आहे. मात्र तिन्ही वेळेस पदरी निराशा पडली.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे दडपण वाढलं होतं. यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर नॅट स्कायव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी ८८ धावांची भागीदारी केली. ब्रंट ३० धावा करून बाद झाली आणि त्यानंतर झटपट विकेटची रांग लागली. मात्र एका बाजूने हरमनप्रीत कौरने मोर्चा सांभाळला. तिने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६६ धावा केल्या. तर तळाशी आलेल्या अमनजोत कौर आणि संस्कृती गुप्ताने काही धावा जोडल्या. त्यामुळे १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात १४१ धावा केल्या आणि सामना ८ धावांनी गमावला.
मुंबई इंडियन्स महिला संघ: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीव सजाना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी.