मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईलवर महिलांचे नग्न, अर्धनग्न व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी शिवडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. व्हिडिओची तपासणी केल्यानंतर आरोपींनी खिडक्या आणि दरवाजांमध्ये फट पाडून व्हीडिओ शूट केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता या प्रकरणी पोलिस कसून चौकशी करीत आहेत. तपासात आणखी धक्कादायक बाबी उजेडात येण्याची चिन्हे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश धनवेद हरिजन, सर्वानन तंगराज हरिजन आणि स्टीफन राज मुर्गेश नाडा या तिघांनी हे व्हिडीओ काढले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवडी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. या घटनेत अन्य आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी २०१९ आणि २०२० मध्ये त्यांच्या भागातील अनेक महिलांचे नग्न आणि अर्धनग्न व्हिडिओ शूट केले होते. मित्रांच्या एका गटात २८ ऑगस्ट रोजी झालेल्या भांडणानंतर ही घटना उघडकीस आली आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. हे तरुण पीडित महिलांच्या घरांच्या दरवाजा, खिडक्यांना छिद्र पाडून, छताला असलेल्या छिद्रातून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. याशिवाय महिलांचे अंघोळ करताना आणि कपडे बदलतानाचेही व्हिडिओ आरोपींनी रेकॉर्ड केले.
आतापर्यंत तीन ते चार पीडित महिलांनी तक्रारी केल्याने हे प्रकरण पुढे आले आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींपैकी एका आरोपीचाही खाजगी व्हिडिओ परिसरातील इतर कोणीतरी रेकॉर्ड केला होता. परिणामी त्यांच्यात वादावादी झाल्याने लोकांना आरोपींच्या कृत्याबद्दल माहिती झाली. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी पोलिसांकडे धाव घेतली. परंतु कोणीही तक्रार देण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि काही महिलांनी पुढे येऊन आरोपींविरुद्ध जबाब नोंदवल्यावर गुरुवारी आयटी कायद्यासह आयपीसीच्या कलम ३५४ सी, २९२ आणि ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.
Women’s Nude Porn Video Shoot Police Crime 3 Arrested
Mumbai Shivdi