रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिलांच्या नावाने काढले परस्पर कर्ज… दाम्पत्याच्या कृत्याने पोलिसही अवाक

by India Darpan
जुलै 31, 2023 | 5:28 am
in राज्य
0
crime 123

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात, आणि उघडकीसही येतात. परंतु ग्रामीण भागात देखील गोरगरिबांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. त्यातच महिलांना एखाद्या रोजगार किंवा लघु उद्योगासाठी कर्ज काढून देतो, असे सांगून फसवणूक करणारे महाभाग खेड्यापाड्यात दिसून येतात. विदर्भातील एका खेड्यात महिलांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवत एका दांपत्याने सहा महिलांची सुमारे दोन लाखांची फसवणूक केली आहे. या महिलांकडून कागदपत्रे जमा करून त्यांच्या नावावर कर्ज काढून हे दाम्पत्य आता फरार झाले आहे.

गरीब महिलांचा विश्वासघात
आपल्याला कोणतीही पायपीट न करता किंवा चकरा न मारता घरबसल्या कर्ज मिळत असल्याने या गरीब महिलांनी कंझारा (ता. खामगाव) येथील राजेंद्र घोगले आणि त्याची पत्नी राजर्षी घोगले दांपत्यावर विश्वास ठेवून त्यांना आधार कार्ड सह आपली सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात दिली. परंतु या दांपत्याने त्याचा गैरफायदा घेत त्यांनी या महिलांचा विश्वासघात केला. जेव्हा बँक अधिकारी दारात उभे राहून कर्जाचा भला मोठा हप्ता मागण्यासाठी आले, तेव्हा या महिलांचे फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन चांगले धाबे दणाणले. याबाबत शाेभा दिनेश तायडे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, राजेंद्र घोगले आणि त्याची पत्नी राजर्षी घोगले यांनी विश्वास संपादन गावातील ६ महिलांना कर्ज काढून देण्याचे आमीष दिले. प्रत्येकी ४ हजार रूपयांचे कर्ज काढल्यानंतर कर्जाची परतफेड स्वत:च करणार असल्याची ग्वाही दिली. दोन्ही आरोपींच्या भूलथांपाना बळी पडून गावातील महिलांची कागदपत्रे जमा करण्यात आली. त्यानंतर संबंधित कागदपत्राच्या आधारे विविध बँका आणि खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत हे दाम्पत्य पसार झाले.

दाम्पत्य फरार
दरम्यान, कर्जच्या वसुलीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर याप्रकरणी फसवणूक झाल्याचे समजताच, एका महिलेने ग्रामीण पोलीसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी दाम्पत्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या कागदपत्रांचा दुरूपयोग करून आरोपींनी खामगाव शहरातील विविध नामांकित राष्ट्रीकृत बँक तसेच खासगी फायनान्स कंपनीकडून तक्रारदार महिलांच्या नावावर विविध बँकाकडून एकूण २, लाख ३५ हजार रुपये कर्ज घेऊन त्याबदल्यात फिर्यादीस २३ हजार रुपये नगदी दिले. विविध बँकेचे वसूली अधिकारी फिर्यादी महिलेच्या घरी आले व तिला तिचे नावावर असलेल्या कर्जबाबत माहिती देऊन पैसे भरण्यास सांगितले. तेव्हा सदर महिला बिचारी हैराण झाली. कारण आरोपींनी फिर्यादीची २ लाख १२ हजार रूपयांची फसवणूक केली होती, तसेच दोन्ही आरोपींनी संगनमत करून गावातील इतर महिलांना विश्वासात घेऊन त्याच्या नावावरही कर्ज घेऊन व त्यांना १० टक्के रक्कम देऊन उर्वरित लोनची रक्कम स्वतः घेऊन या भामटयांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम भरती नाही, त्यानंतर कर्जाची रक्कम घेऊन दोघे आरोपी पसार झाले. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी उपरोक्त आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दांपत्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अदभूत नाशिक (भाग ९) : हे पेंटिंग नाही तर आहे वालदेवीचे पात्र! (बघा अप्रतिम व्हिडिओ)

Next Post

बँक कर्मचाऱ्याने एक फोन केला आणि…. चक्क पोलिसाबाबत हे घडले… तुम्हालाही येऊ शकतो असा अनुभव…

India Darpan

Next Post
crime 6

बँक कर्मचाऱ्याने एक फोन केला आणि.... चक्क पोलिसाबाबत हे घडले... तुम्हालाही येऊ शकतो असा अनुभव...

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011