नाशिक – लग्नानंतर हैद्राबादमध्ये असतांना वडापाव खाण्याची इच्छा झाली, पण, तो लवकर भेटला नाही. पण, तो लांब जाऊन खाल्ला व त्यातूनच महाराष्ट्रीयन पदार्थ बनवण्याची कल्पना सुचली व त्यानंतर आम्ही कॅफे सुरु केल्याचे अमृता काशिकर – रेड्डी यांनी इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले. त्यांच्या या स्टार्टअप व्यवसायाची यशोगाथा महिला दिनानिमित्त समोर यावी म्हणून नाशिकच्या या कन्येची मुलाखत गौतम संचेती यांनी घेतली. लॅाकडाऊन मध्ये कॅफे बंद केल्यानंतरही सोशल मीडियाचा आधार घेऊन ऑनलाईन ऑर्डर घेऊन महाराष्ट्रीय पदार्थ सर्वापर्यंत पोहचवले जात असल्याचेही अमृताने सांगितले. त्याचबरोबर नाशिकचे पदार्थ पुढील काळात हैद्राबादमध्ये कसे ब्रॅण्डींग करता येईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अमृताने सांगितले. तिची ही संपूर्ण मुलाखत बघा या लिंकवर