नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर अपेक्षित यश साध्य करता येते. अगदी व्यवसायातही यशाचे शिखर सर करता येते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सूरज फूड इंडस्ट्रीनेसुद्धा हीच बाब सिद्ध करून दाखविली आहे. सुमारे ३२ वर्षापूर्वी छोटेखाली गृहउद्योगाची सुरूवात झाली होती. मजल दरमजल करीत हा उद्योग मोठ्य व्यवसायात रूपांतरित झाला आहे. याच उद्योगाच्या माध्यमातून महिलांनीही समृद्धी साधली आहे.
१०९० साली परिसरातील महिलांना रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती. यावेळी पारस जैन यांनी सुरज फूड इंडस्ट्री सुरू केली. त्यांनी महिलांना पापड बनवण्यासाठी दिले. ते पापड बाजारपेठेत पारस पापड नावाने विक्रीसाठी मार्केटिंग सुरू केले. बघता बघता जैन यांच्यामुळे ३०० पेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळू लागला. हे होत असतानाच जैन यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू ठेवला. हा व्यवसाय परिसरातील अनेक परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. हा व्यवसाय अनेक निराधार महिलांचा जीवनाचा आधार झाला असून, पारस पापड आणि इतर वस्तूंचा देशभरातील बाजारपेठेत बोलबाला झाला आहे.
दिवसाकाठी पाचशे रुपयांवर मिळकत
शहाद्यासारख्या ग्रामीण भागात रोजगाराच्या कोणत्याही संधी नाहीत. त्यासोबत अनेक कुटुंब पुरुषांच्या व्यसनाधीनतेमुळं उध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. मात्र, पारस पापडच्या माध्यमातून शहरातील ३०० पेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. पापड उद्योगाच्या माध्यमातून दिवसाला पाचशे ते सातशे रुपयांची कमाई होत असल्यानं कुटुंबाचा गाडा हाकणे सोपे झाले असल्याच्या प्रतिक्रिया या उद्योगात काम करणाऱ्या महिला देतात.
यशाची चतुसूत्री
कोणताही व्यवसाय करताना सचोटी शुद्धता आणि प्रामाणिक प्रयत्न राहिले तर त्याचे वटवृक्ष होण्यास वेळ लागत नाही हे सुरज फूड इंडस्ट्रीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. आपल्या भागांत असलेल्या कच्च्या मालाचा सदुपयोग करत लघुउद्योग आणि गृह उद्योगातूनही मोठे व्यवसायिक होता येते, हे जैन परिवाराने सिद्ध केले आहे.
Women’s Day Shahada Papad Industry 300 Women’s