इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आर्मी रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यदल लवकरच शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल ऑफिसर पदांवर भरती प्रक्रिया सुरू करणार आहे.
या अधिसूचनेनुसार, 59 व्या कोर्स शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) अंतर्गत पुरुष आणि 30 व्या कोर्स शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) अंतर्गत तरुणी व महिलांसाठी भरती केली जाईल. इंडियन आर्मी एसएससी कोर्स ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 8 मार्च 2022 पासून तांत्रिक अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2022 आहे.
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्यांना फक्त सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिकांसह अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. आपण निर्धारित वेळेपूर्वी पदवी दर्शवू शकता.
वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड:
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्ट, एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.
अर्जाची प्रक्रिया:
1. सर्वप्रथम joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. ऑफिसर्स एंट्री अर्ज विभागात जाऊन येथे अर्ज करा.
3. यासाठी उमेदवाराला प्रथम नोंदणी करावी लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ईमेल आणि पासवर्डद्वारे लॉगिन करून अर्ज करावा लागेल.