मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे एक पत्र सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. हे पत्र विधवा महिलांसंबंधी आहे. या पत्रावरुन अनेकांनी शिंदे सरकार आणि मंत्री लोढा यांना चांगलेच लक्ष्य केले आहे. विधवा ऐवजी यापुढे गंगा भागीरथी असा शब्द वापरण्यात यावा, असे मंत्री लोढा यांनी पत्रात लिहिले आहे. त्यास अनेकांनी विरोध केला आहे.
मंत्री लोढा यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचं स्थान मिळालं आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं.भा.) हा शब्द वापरण्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून चर्चा करावी.
सोशल मिडियावर खालीलप्रमाणे प्रतिक्रीया उमटत आहेत
https://www.facebook.com/snarepawar/posts/10222834226380532
https://www.facebook.com/kavita.mhetre.9/posts/3009769405833317
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=3465868930369319&id=100008387382375
https://twitter.com/RAHUL121213/status/1646361661861941251?s=20
Women Welfare Minister Lodha Letter Viral Widow Name