नवी दिल्ली – ‘कामातूर भय ना लज्जा’ असे म्हटले जाते. म्हणजे दोन प्रेमी किंवा रोमान्स करणारे जोडपे यांना स्थळ, काळ आणि वेळाचे कसलेही भान नसते. असे प्रकार आपण अनेक वेळा दिवसा ढवळ्या घडतात. परंतु प्रेम करणाऱ्या जोडप्याला याची लाज नसते. याउलट बघणारेच लाजेने तिथून निघून जातात. यापेक्षाही भयानक प्रकार एका देशात घडला. नेमका काय होता प्रकार?
अर्जेंटिनाच्या ला प्लाटा येथील एका २८ वर्षीय महिलेचे असे लाजिरवाणे कृत्य समोर आले असून, तिला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला तिच्या स्वतःच्या दोन मुलांसह (दोघांचे वय २ आणि ५)कारने जात होती, तेव्हा रस्त्यात तिला तिचा प्रियकर भेटला तेव्हा ती त्याच्याशी प्रेम तथा रोमान्स चाळे करू लागली. यासाठी त्याने आपल्या दोन्ही लहान मुलांना गाडीतून खाली उतरवले. दोन्ही मुलांना काही समजले नाही आणि ते गाडीच्या काचा मधून आत डोकावत राहिले. विशेष म्हणजे या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
वास्तविक, महिलेने तिच्या दोन निरागस मुलांसमोर असे वाईट कृत्य केल्याने नागरिक तिच्यावर संतापले. हा सर्व प्रकार घडला जेव्हा महिला तिच्या प्रियकरासोबत कारमध्ये होती. आपल्या मुलांना कारमधून बाहेर काढले आणि तिच्या प्रियकराला कारमध्ये बोलावले. ही घटना ला प्लाटा येथील पेरीरा इराओला पार्कची आहे. या महिलेने प्रियकरासोबत रोमान्स सुरू केला. बराच वेळ ती गाडीतच राहिली आणि बाहेरची दोन्ही मुले डोकावून आत येण्यासाठी विनंती करत होती.
त्याचवेळी कोणीतरी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जोडप्याला ताब्यात घेतले. मुलांचे वडील तेथे नव्हते, तो महिलेचा प्रियकर असल्याचे सांण्यात आले आहे. त्याच्यावर मुलांवर अत्याचार, तसेच माहिलेवर अल्पवयीन मुलांना एकटे सोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे.