इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खूप काळ एकत्र राहील्यानंतर एखाद्या जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल, तर पुरुषी बलात्काराचा आरोप लावता येत नाही. एका जामीन याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने ही माहिती दिली. जर संबंध जुळले नाहीत तर त्या पुरुषाला बलात्काराचा दोषी मानता येणार नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. याप्रकरणी न्यायालय लवकरच निकाल देण्याची शक्यता आहे.
नवनीत एन. नाथ यांच्या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. एका महिला सहकाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीच्या आधारे या पुरूषाला अटक करण्यात आली आहे. तिने असे आरोप केले की, नाथ या महिलेसोबत सुमारे 4 वर्षे संबंधात होते, परंतु नंतर त्याने दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार महिलेला समजल्यानंतर तिने हॉटेलमध्ये नाथच्या होणाऱ्या पत्नीची भेट घेतली. तसेच तिने नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे.
याप्रकरणी पोलीस चौकशीदरम्यान महिलेने आपली फिर्याद सांगितली, त्यामुळे त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. नाथ यांची बाजू मांडणारे अधिवक्ता रमेश चंदर यांनी याचिकाकर्त्याला महिलेशी लग्न करायचे होते आणि त्यांचे अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध होते, ते पूर्णपणे सहमतीने होते, असे पुरावे सादर केले.
न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी निरीक्षण केले की, गेल्या काही दशकांमध्ये दोघांमधील संबंधांचे स्वरूप आणि अपेक्षा खूप बदलल्या आहेत. आता जर स्त्री-पुरुषाचे संबंध नीट राहीले नाहीत, तर त्यामुळे बलात्काराचे आरोप लावता येणार नाहीत. नातेसंबंधातील बदलांमुळे या जोडप्याने वेगवेगळे राहाणे पसंत केले आणि इतरांशी लग्न केले. त्यामुळे या घटनेत लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एखाद्या व्यक्तीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले असे दिसत नाही
मात्र, या प्रकरणात लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी घेण्यात आली आहे का, हेही पाहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, नाथच्या वकिलाने न्यायालयाला असेही सांगितले की, तिच्या पालकांनी त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतरच तो दुसऱ्या महिलेला भेटला होता, ती आता त्याची मंगेतर म्हणजे होणारी बायको तथा नियोजित वधू आहे.
तसेच चंदर यांनी न्यायालयाला असेही सांगितले की, या जोडप्याला सुरुवातीपासूनच याची जाणीव होती की भिन्न धर्मातील असल्याने त्यांना या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. हे माहित असूनही महिलेने संबंध सुरू ठेवले. याठिकाणी महिलेची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सांगितले की, लग्नाचे वचन दिल्याने दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले होते ते आता वचन खोटे ठरले आहे. त्याच वेळी, सरकारी वकिलांनीही नाथ यांच्या जामिनाला विरोध केला.
Women Rape Relationship High Court Order Legal