इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील काँग्रेसचे नेते व मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याने जयपूर व दिल्लीत एका २३ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जयपूर येथे दि. ८ जानेवारी २०२१ ते १७ एप्रिल २०२२ दरम्यान माझ्यावर अनेक वेळा बलात्कार झाला. तसेच उत्तर दिल्लीत बलात्कार, अंमलीपदार्थ दुखापत, गर्भपात, जबरदस्तीने लग्न करण्यासाठी महिलेचे अपहरण, अनैसर्गिक गुन्हे, गुन्हेगारी धमकी आणि विनयभंग या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला.
गेल्या वर्षी फेसबुकच्या माध्यमातून मंत्र्याच्या मुलाला भेटल्याचा आरोप महिलेने केला आहे. जयपूरमध्ये दोघांची भेट झाली. तिला सवाई माधोपूर, राजस्थान येथे बोलवण्यात आले होते. तसेच या महिलेने सांगितले की, माझ्या ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले, तेव्हा त्याने मला फोटो आणि व्हिडिओ दाखवले त्यात मी नग्न होते. त्यामुळे मी काळजीत पडले आणि रडू लागले.
त्यानंतर त्याने मला एका हॉटेलमध्ये राहायला लावले जिथे त्याने पती-पत्नी म्हणून आमची नावे नोंदवली. नंतर त्याने मला लग्न करण्याचे वचन दिले, पण नंतर त्याने दारूच्या नशेत जाऊन मला शिवीगाळ केली. तो माझ्यासोबत अश्लील व्हिडिओ बनवायचा. तो अपलोड करून व्हायरल करण्याची धमकी द्यायचा.
महिलेने पुढे म्हटले आहे की, गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये, मला समजले की, मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. मात्र त्याने सांगितले की, हे मूल होऊ त्याचे होऊ शकत नाही. त्याने मला गोळी घेण्यास भाग पाडले, परंतु त्याने दिल्ली आणि जयपूरमध्ये अनेकदा माझ्यावर बलात्कार केला. तसेच त्याने तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले.
याबाबत राजस्थान पोलिसांना कळवले असून ते अधिक तपास करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, महेश जोशी यांच्या मुलावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राजस्थानचे मंत्री प्रमोद जैन भाया म्हणाले की, राजकारणात आरोप करणे आणि प्रतिदावे करणे हे सामान्य आहे.
दरम्यान, महेश जोशी यांनी सांगितले की, आपण जयपूर मध्ये नसून दुसऱ्या दिवशी परतणार आहोत. तर त्यांचा मुलगा रोहितने मीडियाशी बोलण्यास नकार दिला.