इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संस्कृती महिलांचा सन्मान करण्यात येतो, असे म्हटले जाते. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी महिलांचा अपमान केला जातो. इतकेच नव्हे तर महिलांचा विनयभंग, मारहाण करणे असे प्रकार घडतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी कुणालाही मारहाण होत असली तर त्याला विरोध करणे ही नागरिकांचे कर्तव्य ठरते. परंतु कर्नाटकमध्ये असाच एक अमानुष प्रकार घडला.
येथे एका महिला वकीलला मारहाण करताना आजूबाजूला उभी असलेले नागरिक मात्र जणू काही तमाशा बघत होते. या प्रकाराबद्दल खळबळ उडाली असून सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. बागलकोटमध्ये एका महिलेला सार्वजनिकरित्या मारहाण करण्यात आली. बाजाराच्या मध्यभागी तिला लाथ आणि बुक्कीने मारण्यात आले. इतकेच नव्हे तर आरोपीने तिच्या पोटावर लाथा मारल्या, थापांचा वर्षाव केला. महिला वकील विनवणी करत राहिली, पण आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांपैकी कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. मात्र, नंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध कारवाई सुरू केली. तसेच आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना विनायक नगर परिसरातील सर्कल रोडवर घडली. येथे महांतेश नावाच्या व्यक्तीने संगीता शिकेरी नावाच्या महिलेला मारहाण केली. संगीता या व्यवसायाने वकील आहेत. महांतेश आणि संगीता हे एकमेकांचे शेजारी असून दोघांमध्ये मालमत्तेवरून बराच काळ वाद सुरू होता. आरोपी महतेश हा फोटोग्राफीचे काम करतो. आरोपी महांतेशने आधी संगीता यांच्या गालावर थापड मारली. यानंतर त्याने संगीताच्या पोटावरही लाथ मारली.
सर्वात वाईट प्रकार म्हणजे संगीताला वाचवण्याऐवजी नागरिक या घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसले. यानंतर या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला वकिलाला या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला यांच्यात मालमत्तेच्या वादातून यापूर्वी अनेकदा मारामारी झाली आहे.
https://twitter.com/MdFasahathullah/status/1525510083504791552?s=20&t=MDth7DAFejB5jzRfQpW0cA